आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन.*
1 min read

आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन.*

Loading

*आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन.*

अनिल करंदकर

सातारा/ कोरेगाव तालुक्याच्या दमदार आमदार आणि राज्याच्या माजी महसुलमंत्री, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे अशी ठाम भूमिका दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. विशेषतः सामाजिक न्यायासाठी आर्थिक निकषांवर आरक्षणाचा मुद्दा त्यांनी त्या काळात धैर्याने पुढे आणला होता. कोरेगाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही स्मरणात राहील.
त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन रविवार दि. २१/१२/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सातारारोड येथील चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मौजे पाडळी स्टे. (सातारा रोड), ता. कोरेगाव, जि. सातारा येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, निर्भीड व दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले असून,अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आणि व्हाईस आँफ मिडिया सातारा जिल्हा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.मराठी लाईव्ह न्युज सातारा अनिल करंदकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *