अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : जनतेच्या कौलाने सत्तांतर, डॉ. परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष धनशक्तीला नाकारून नव्या नेतृत्वाला संधी; मातब्बर उमेदवारांचा पराभव, शहरात परिवर्तनाची लाट
![]()
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : जनतेच्या कौलाने सत्तांतर, डॉ. परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष
धनशक्तीला नाकारून नव्या नेतृत्वाला संधी; मातब्बर उमेदवारांचा पराभव, शहरात परिवर्तनाची लाट
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक अत्यंत चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि शिवसेनेचे नेते माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यात थेट आणि काट्याची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोप आणि जनतेशी थेट संवाद यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. विशेष म्हणजे, माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतरही त्यांनी दुःख बाजूला ठेवत आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करत भावनिक साद घातली. त्यांच्या या भावनिक आवाहनाला अमळनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि अखेर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांना स्पष्ट बहुमताने निवडून दिले.
या निवडणुकीचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी पारंपरिक राजकारणाला छेद देत अनेक जुन्या व मातब्बर उमेदवारांना पराभूत केले आणि नव्या, कार्यक्षम व विश्वासार्ह चेहऱ्यांना संधी दिली. “धनशक्ती विरुद्ध सामान्य जनता” असे वातावरण निर्माण झाले असताना, जनतेने स्पष्टपणे बदलाचा कौल दिला आणि नगरपरिषदेत सत्तांतर घडवून आणले. नगराध्यक्षपदासाठी डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी ३०,८५६ मते मिळवत ८,६४८ मतांची आघाडी घेतली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी जितेंद्र ठाकूर यांना २२,२०८ मते मिळाली.
विजय घोषित होताच अमळनेर शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. माजी आमदार शिरीष दादा चौधरी, हिरा उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र चौधरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच माजी आमदार चौधरी यांचा मित्रपरिवार यांनी वाजत-गाजत डॉ. परीक्षित बाविस्कर यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार शिरीष दादा चौधरी व डॉ. रवींद्र चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अमळनेरकर जनतेने सत्तेमध्ये बदल करून दाखवला आहे. या विश्वासाबद्दल आम्ही सर्व अमळनेरकरांचे ऋणी आहोत. नगरपरिषदेत सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही भावना व्यक्त करताना सांगितले की, “अमळनेरकरांनी शेवटी करून दाखवले. योग्य व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल बाविस्कर परिवार सदैव ऋणी राहील. शहराच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू.” प्रभाग १६ मधील युवा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पितांबर पाटील यांनी मतदारांचे आभार मानत, नीलिमा विश्वनाथ पाटील आणि महेश प्रभाकर देशमुख या अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आश्वासन दिले. तर प्रभाग १५ मधील विजयी उमेदवार प्रशांत मनोहर निकम यांनी, “अमळनेरकरांनी धनशक्तीला नाकारून योग्य उमेदवारांना निवडले. शहराच्या विकासात माझा सक्रिय सहभाग राहील,” अशी ग्वाही दिली.
एकूणच, अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ ही केवळ सत्ता बदलाची नव्हे, तर जनतेच्या जागरूकतेची, नव्या विचारांची आणि परिवर्तनाच्या अपेक्षांची ठोस अभिव्यक्ती ठरली आहे.
अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल दादा पाटील यांनी सांगितले की शहर विकास आघाडीला मिळालेले यश हे आम्ही स्वीकारतो पराभव ही स्वीकारतो .. व सर्व मतदार बंधू भगिनींचे धन्यवाद व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले..
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग १ अ – कविता विजय राजपूत,प्रभाग १ ब – कैलास नामदेव पाटील,प्रभाग २ अ – कांबळे देवेंद्र भानुदास,प्रभाग २ ब – अफसाना मुक्तार खाटीक प्रभाग ३ अ – शोभाबाई भिवसन गढरे,प्रभाग ३ ब – भरतकुमार सुरेश ललवाणी,प्रभाग ४ अ – नंदा नरेंद्र संदानशिव,प्रभाग ४ ब – शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन,प्रभाग ५ अ – श्रीराम भगवान चौधरी,प्रभाग ५ ब – कल्पना भरतसिंग परदेशी,प्रभाग ६ अ – सविता योगराज संदानशिव,प्रभाग ६ ब – दीपक हरी चौगुले,प्रभाग ७ अ – प्रा. योगिता सयाजीराव कापडणेकर,प्रभाग ७ ब – प्रवीण गंगाराम पाटील (राजू फाफोरेकर),प्रभाग ८ अ – सचिन बळवंत पाटील (बिनविरोध),प्रभाग ८ ब – अपूर्वा जालंधर चौधरी,प्रभाग ९ अ – शर्मा कल्पना चंद्रकांत,प्रभाग ९ ब – चौधरी पंकज पंडित,प्रभाग १० अ – संजय विभाकर कासार (गोपी कासार),प्रभाग १० ब – स्वाती परदेशी,प्रभाग ११ अ – छाया बाळू पाटील
प्रभाग ११ ब – विजय कहारू पाटील,प्रभाग १२ अ – पुष्पा पंकज भोई,प्रभाग १२ ब – धनगर सुयोग ज्ञानेश्वर,प्रभाग १३ अ – जुबेदाबी नशिरोद्दिन काझी,प्रभाग १३ ब – अनिल गंगाराम महाजन (अबू महाजन)
प्रभाग १४ अ – सौ. सुवर्णा तुळशीराम हाटकर,प्रभाग १४ ब – रामकृष्ण बाबुराव पाटील,प्रभाग १५ अ – प्रशांत मनोहर निकम
प्रभाग १५ ब – पाटील जयश्री अनिल
प्रभाग १६ अ – देशमुख महेश प्रभाकर (महेश बापू),प्रभाग १६ ब – नीलिमा विश्वनाथ पाटील,प्रभाग १७ अ – पाटील स्वप्ना विक्रांत,प्रभाग १७ ब – पवार साहेबराव वसंत,प्रभाग १८ अ – रूपाली विलास शिवदे
प्रभाग १८ ब – इर्शाद सुनिल तडवी यांचा समावेश आहे..
निवडणूक अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये
उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे,
निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, व सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी महसूलचे कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार्य केले.. पोलीस कर्मचाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
काही विजयाची क्षणचित्रे







