पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन
1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी :
स्वच्छतेचे महामंत्र देत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन केले, तर मेघाताई भांडारकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, साधेपणा व समाजसेवेच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व विशद केले.

या प्रसंगी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष हेमंतदादा भांडारकर, मेघाताई भांडारकर, चंद्रकांत पुरकर, पी. पी. माळी सर, सुरेश महाजन, साने गुरुजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव सर, सुरेश महाजन गुरव, हरीश जाधव तसेच साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वाचनप्रेमी नागरिक व वाचनालयाचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमामुळे उपस्थितांना संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा परिचय होऊन स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि वाचनसंस्कृती जपण्याची प्रेरणा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *