धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण…,  लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध…
1 min read

धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण…, लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध…

Loading

धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण…

लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध…

धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर

धरणगाव — येथील तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे आज तहसिल कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांचे झालेले अन्यायकारक निलंबन व मौजे मांडळ, तालुका अमळनेर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर वाळू माफियाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तसेच १५ दिवस उलटूनही आरोपी अटक न झाल्याने तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते ग्राम महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, संवर्गातील महसुल सहाय्यक अधिकारी आदींनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *