इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न   आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
1 min read

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

Loading

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न

आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सिकलसेल’ या अनुवंशिक आजाराविषयी रक्तनमुने घेऊन विशेष आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमात आरोग्यवर्धिनी केंद्र, अमळनेर येथील डॉ. पुष्पक ईश्वर चौधरी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार सर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आरोग्य सेविका कविता महानुभाव, प्रतिभा गढरी, लॅब टेक्निशियन सारिका मोरे, आशा स्वयंसेविका रोहिणी मगरे व स्वाती भावसार यांनी विद्यार्थ्यांच्या तपासणीत मोलाचे सहकार्य केले.
डॉ. पुष्पक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराचे स्वरूप, रक्ताचे नमुने कसे घेतले जातात, कोणकोणत्या रक्तचाचण्या केल्या जातात यासह आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. आजार टाळण्यासाठी योग्य आहार, स्वच्छता व वेळेवर तपासणीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री व्ही.डी. पाटील, पी.एम. ठाकरे, वाय.जे. पाटील, डी.एस. माळी, ए.पी. जाधव तसेच सौ. भारती चव्हाण, सौ. वंदना पाटील, सौ. छाया पाटील, अर्चना महाजन व सुषमा तेले यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री डी.ए. सोनवणे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी नाश्ता व चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *