एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना
1 min read

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना

Loading

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना

अमळनेर प्रतिनिधी —
आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. विभाग, ग्रामीण रुग्णालय अमळनेर तसेच खानदेश शिक्षण मंडळ संचलित कै. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी फार्मसी, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली “एकजुटीने एकत्र येऊन एचआयव्ही–एड्सला लढा देऊ व नवपरिवर्तन घडवू” या उद्देशाने महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयीन स्तरावर एचआयव्ही–एड्स जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे व देवेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही–एड्स संदर्भातील प्रतिबंध, उपचार व सामाजिक जाणीव याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनवणे यांनी रेड रिबन क्लब स्थापनेस मान्यता देत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रा. अनिल बोरसे यांनी वार्षिक एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रमाची आखणी करताना युवकांचा सक्रिय सहभाग कसा वाढविता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
या जनजागृती मोहिमेत प्रो. शिवानी शर्मा, प्रो. हर्षदा पवार, प्रो. मानसी उपासनी, प्रो. प्रियंका महाजन, जितेंद्र पाटील, कैलास कड, प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय चेअरमन योगेश मुंदडा यांनी सर्व उपस्थितांचे व सहभागींचे आभार मानत, भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *