डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली बैठक संपन्न; शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना गती
1 min read

डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली बैठक संपन्न; शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना गती

Loading

डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली बैठक संपन्न; शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना गती

अमळनेर प्रतिनिधी :
काल दिनांक 14 डिसेंबर (रविवार) रोजी अमळनेर येथील डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली अधिकृत बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत इतिहासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढविण्यासाठी येत्या काही दिवसांत विविध शाळांमध्ये वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धांतील विजेत्यांना आझादांची प्रतिमा भेटस्वरूपात देण्यात येणार असून स्पर्धेचा विषय व वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एच.आर.ए.च्या कार्याचा प्रसार करून टिम विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानुसार लवकरच धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत टिम सक्रियपणे कार्यरत होणार आहे. प्राथमिक चर्चा व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील टिमसह लखनऊ येथे भेट देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तसेच, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांसोबतच प्रत्येक राज्यातील मातृभाषेत शिक्षणाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस उपस्थित मान्यवर :
कमलेश कुलकर्णी – महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष, एच.आर.ए.शशिकांत पाटील – जळगाव कोषाध्यक्ष,कुलदीप खोरे – जळगाव-अमळनेर जिल्हा परिषद गटाध्यक्ष,
गिरीश पाटील – जळगाव जिल्हा प्रसार अध्यक्ष
या बैठकीमुळे एच.आर.ए. टिमच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळाल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *