लेखक रवींद्र सोनवणे यांच्या भटकन कादंबरीस मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार**
1 min read

लेखक रवींद्र सोनवणे यांच्या भटकन कादंबरीस मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार**

Loading

*लेखक रवींद्र सोनवणे यांच्या भटकन कादंबरीस मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार**

जळगांव प्रतिनिधी
नेहरू विद्यालय किनगाव ता. यावल येथील मुख्याध्यापक लेखक रवींद्र सोनवणे यांच्या ग्रामीण बोलीभाषेतील संघर्षाने भरलेली मनाला प्रेरणा देणारी भटकन कादंबरी विद्यार्थी, तरूण, वयोवृद्ध वाचक, शिक्षण प्रेमी यांच्या इच्छेला भावणारी आणि वाचकांना उत्सुकता निर्माण करणारी आहे.
भटकन मध्ये विनोद तर आहेतच परंतू संघर्ष करून आयुष्यात आनंदाचे अंकूर कसे फुलतात हेच कादंबरीतून लेखकांनी मांडले आहे. आयुष्यात सगळं शक्य आहे ते वेळोवेळी हेरलं पाहीजे असे मत लेखकांनी स्पष्टपणे कादंबरीतून व्यक्त होतांना सांगितले आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्राप्त कादंबरी साहित्यातून भटकन कादंबरीचे अतिशय छान परीक्षण होऊन यातून द्वितीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली. मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबईच्या वतीने होमीभाभा च्या कार्यात सतत कार्य करणारे तसेच शोध निबंधांचे लेखक प्रयोगशील शास्रज्ञ डाॅ. बाळ फोंडके यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नेहरू विद्यालयाचे किनगावचे चेअरमन आबासो. श्री. उमाकांत रामराव पाटील यांनी अभिनंदन केले. परीसरातून समस्त मित्र परीवारातून नेहरू विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनी लेखक श्री रवींद्र सोनवणे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *