निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणारी माहिती. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त )
![]()
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणारी माहिती.
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त )
निवडणुकीत उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला द्यावी लागते.तुम्हाला स्वतःबद्दलची अत्यंत पारदर्शक आणि विस्तृत माहिती द्यावी लागते.
प्रामुख्याने ‘नामनिर्देशन पत्र’ आणि ‘शपथपत्र’ (Affidavit – Form 26) द्वारे ही माहिती द्यावी लागते. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. वैयक्तिक माहिती आणि ओळख
पूर्ण नाव आणि पत्ता: मतदार यादीत जसे नाव आहे, तसेच नाव आणि सध्याचा राहता पत्ता.
मतदार यादीतील क्रमांक: तुम्ही ज्या वॉर्डमध्ये किंवा भागात राहता, तेथील यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक.
संपर्क माहिती: तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी.
सोशल मीडिया: तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची (Facebook, Twitter, Instagram इ.) माहिती.
२. गुन्हेगारी पार्श्वभूमी (अत्यंत महत्त्वाचे)
निवडणूक आयोगासाठी हा भाग अत्यंत संवेदनशील असतो. तुम्हाला खालील माहिती देणे बंधनकारक आहे:
तुमच्यावर कोणतेही फौजदारी खटले प्रलंबित आहेत का?
तुम्हाला कोणत्याही न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे का?
जर गुन्हे दाखल असतील, तर एफआयआर (FIR) क्रमांक, पोलीस ठाणे आणि कलमांची माहिती.
(टीप: कोणतीही केस लपवून ठेवल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो.)
३. संपत्तीचा तपशील (स्थावर आणि जंगम मालमत्ता)
तुम्हाला स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या संपत्तीचा तपशील द्यावा लागतो:
जंगम मालमत्ता हातातील रोख रक्कम, बँकेतील ठेवी, शेअर्स, विमा पॉलिसी, आणि वाहने (गाड्यांचे मॉडेल व नंबर).
दागदागिने: सोन्या-चांदीचे दागिने आणि त्याचे सध्याचे बाजारमूल्य.
स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर असलेली शेतजमीन, अकृषिक जमीन, फ्लॅट, घर किंवा इतर इमारती.
४. आर्थिक दायित्व आणि कर्ज
बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज.
शासकीय थकबाकी (उदा. पाणीपट्टी, घरपट्टी, वीज बिल किंवा इतर करांची थकबाकी).
GST किंवा प्राप्तिकर विभागाची कोणतीही थकबाकी.
५. शैक्षणिक पात्रता
तुमचे शिक्षण कोठपर्यंत झाले आहे, उत्तीर्ण वर्ष आणि शाळा/कॉलेजचे नाव.
६. इतर अत्यावश्यक कागदपत्रे व बाबी
स्वतंत्र बँक खाते: निवडणुकीच्या खर्चासाठी तुम्हाला एक नवीन आणि स्वतंत्र बँक खाते उघडावे लागते. अर्ज भरल्यापासून निकालापर्यंतचा सर्व खर्च याच खात्यातून करावा लागतो.
राखीव जागेसाठी (जर लागू असेल): जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र .
अनामत रक्कम खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी आयोगाने ठरवून दिलेली अनामत रक्कम भरावी लागते.
सूचक तुमच्या अर्जाला अनुमोदन देण्यासाठी त्याच वॉर्डमधील एका मतदाराची (सूचक म्हणून) स्वाक्षरी आवश्यक असते.
७. महत्त्वाची प्रतिज्ञापत्रे.
काही विशिष्ट नियमांचे पालन करत असल्याचे तुम्हाला लिहून द्यावे लागते, उदा:
शौचालय: तुमच्या घरी वापरण्यायोग्य शौचालय आहे.
लहान कुटुंब: २००५ नंतर तुम्हाला तिसरे अपत्य झालेले नाही (२ मुलांचा नियम).
अतिक्रमण: तुम्ही कोणत्याही सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले नाही.
महत्त्वाची टीप: सध्या निवडणूक आयोग बहुतेक प्रक्रिया ऑनलाईन (TrueVoter App किंवा आयोगाच्या वेबसाइटद्वारे) राबवते. तिथे माहिती भरून त्याची प्रिंट आणि मूळ कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागतात.
अखेर महानगर पालिकेचे बिगुल वाजले
आजपासून राज्यात महानगर पालिकेच्या आदर्श आचारसंहिता जाहीर
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर2025 नाम निर्देशन (फॉर्म भरणे)
31 डिसेंबर 2025 नामनिर्देशन छाननी
02 जानेवारी 2026 उमेदवारी माघार घेणे
03 जानेवारी अंतिम चिन्ह वाटप
*15 जानेवारी 2026 मतदान*
*16 जानेवारी 2026 मतमोजणी*
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष दोघेही कामाला लागलेले आहेत. राज्यातील सर्वच पक्षासाठी ही महापालिकेची निवडणूक महत्त्वाची ठरलेली आहे. राजकारणातील नेते कोणत्या पक्षात असतील हे काय सांगता येत नाही? परंतु कार्यकर्ते मात्र आता बिथरलेले आहेत . महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले नेते कार्यकर्ते शिवसेना पक्षात गेले तर शिवसेनेतील काही कार्यकर्ते नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले पण आता मात्र दोन भाऊ एक झालेले आहेत .कार्यकर्ते मात्र ना घर का ना घाट का अशी अवस्था काही नेत्यांची झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर या महानगरपालिकेत निवडणुकीत एकत्र झाली तर काँग्रेस पक्ष मात्र स्वतंत्र लढणार आहे अशी घोषणाच काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय व इतर परप्रांतीयांना केलेली भाषिक वादावरून मारहाण या निवडणुकीत महागात पडणार आहे यामुळेच काँग्रेसने एक लाचलो रे चा नारा दिला आहे.

