मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!
![]()
मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!
भारतामध्ये अनेक लोक दानशूर म्हणून होऊन गेले… जमशेदजी टाटा यांच्या परिवाराने आपल्या देशाला अनमोल असे योगदान दिलेले आहे.. त्यांचे ज्वलंत उदाहरण रतन शेठ टाटा यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली … हाशिम प्रेमजी यांनी भारताला आपल्या संपत्तीतील भाग समाजकार्यासाठी दिलेला आहे… अशाच दानशूरांमध्ये श्रीमंत प्रताप शेठ यांचे नाव घेतले जाते… श्रीमंत प्रताप शेठ यांचा जन्म ११ डिसेंबर १८७९ ला मोहनपुरा या जयपुर जिल्ह्यात झाला.. प्रताप शेठ यांच्या वडिलांचे नाव छोटुराम होते.. आईचे नाव शिवकुवरबाई होते… प्रताप शेठ यांचे आजोबा गोपीराम हे जयपुर जवळील कालाडेरा या गावचे सरपंच होते… फार नीतिमान होते.. ते उंटांचा व्यापार करीत असत… त्यांच्याकडे शेती वगैरे नव्हती.. इंग्रजांचे राज्य असल्याने राणीच्या हुकूमानुसार उंट गाडी पुरविण्याचे काम आजोबा करीत असत.. कालाडेरा या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करणे, तंटे मिटविणे, लोकांना धार्मिक मार्गदर्शन करणे अशी त्यांचे काम होते… गोपीराम यांना वेळोवेळी कालाडेरा या ठिकाणी जावे लागे… त्यांनी आपले कुटुंब नवापूर येथे ठेऊन आपले काम सुरू ठेवले… त्यांना ३ मुले होती. त्यापैकी छोटुराम हा लहान मुलगा… याने वडिलांची जबाबदारी स्वीकारणे.. त्याला तीन मुले होती त्यापैकी रामप्रताप म्हणजे प्रताप शेठ होय… प्रताप शेठ त्यांचे ३ रे अपत्य होय…
प्रताप शेठ हे चोपड्यातील माणिकचंद रतीराम अग्रवाल यांचे दत्तक पुत्र होत… काला डेरा येथे माणिकचंद शेठ यांनी काशिदास रामचंद्र या नातेवाईकास पाठवून दत्तक पुत्र शोधण्याचे काम दिले होते.. त्याप्रमाणे काशिदास यांनी कालाडेरा येथे जाऊन तेथील नवापुरा येथील छोटू राम यांना भेटून दत्तक पुत्राची मागणी केली… त्यानुसार रामप्रताप म्हणजेच प्रताप शेठ यांच्या आजीने व वडिलांनी दत्तक जाण्याचे रामप्रतापला सुचविले… आर्थिक परिस्थिती अगदी वेताची होती. त्यामुळे एखाद्या नातवाचे भले होईल या उद्देशाने आजीबाईंनी रामप्रतापला दत्तक असे दिले… त्यानुसार प्रताप शेठ साडे नऊ वर्षाच्या असताना दत्तक पुत्र म्हणून चोपड्याच्या माणिकचंद अग्रवाल यांना मिळाले… प्रताप शेठ यांचे बारा वर्षाचे असताना सुंदराबाई या कन्याशी विवाह झाला… प्रताप शेठ लहान असताना लग्नानंतर तीन वर्षांनी माणिकचंद शेठ यांचे निधन झाले… सर्व जबाबदारी प्रताप शेठ म्हणजेच मोतीलाल अग्रवाल यांच्यावर पडली… माणिकचंद शेठ यांचे मुनीम गोकुळदास यांनी प्रताप शेठ यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून तसेच वाद्याने मन लागावे म्हणून सावळाराम बालाजी नाईक या शिक्षकांची प्रताप शेठ यांना शिकवण्यासाठी व्यवस्था केली… प्रताप शेठ यांनी सत्तार वाद्य शिकले… त्यासोबत गणित, संस्कृत, व्यवहार ज्ञान त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान याचेही ज्ञान प्रताप शेठ यांनी शिकले… प्रताप शेठ यांना तत्वज्ञानाची फारच आवड निर्माण झाली.. सावळाराम गुरुजी यांनी प्रताप शेठ ला शंकराचार्यांचे अद्वेत तत्वज्ञान शिकविले… प्रताप शेठ यांच्याकडे चोपड्याला जीन होती.. त्याचप्रमाणे स्वदेशी कपड्याचे दुकान होते… शेती व उद्योग असे दोन व्यवसाय त्यांच्याकडे होते… माणिकचंद शेठ हे मोठे सावकार होते.. ते चोपडा येथील ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून देखील निवडून आलेले होते… त्यांच्या मोठा लवाजमा होता… प्रताप शेठजींना लोकमान्य टिळकांनी चालवलेल्या स्वदेशी चळवळीचे आकर्षण झाले… त्यामुळे त्यांनी स्वतःचा कापडाचा उद्योग सुरू करण्यासाठी वल्लभदास शेठ येवला यांचे मार्गदर्शन घेऊन कापड मिल स्थापन करण्याचे ठरविले.. त्यासाठी अहमदाबाद व मुंबई जाऊन माहिती घेतली… कापड मिल साठी त्यांनी अमळनेर येथील रेल्वेची सुविधा असलेले गाव निवडले.. त्यामुळेच श्रीमंत प्रताप शेठ अमळनेर आले… अमळनेर मध्ये कापड मिल सुरू करून अमळनेर सरांना रोजगार दिला…. गावातील लोकांसाठी धर्मदाय दवाखाना ही सुरू केला… १९१२ ला खानदेश एज्युकेशन संस्था स्थापन करून प्रताप हायस्कूल, जी एस हायस्कूल तसेच कन्या हायस्कूल सुरू केले… महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रताप कॉलेज स्थापन केले… तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा यासाठी १ जुलै १९१६ ला तत्त्वज्ञान मंदिराची स्थापना केली… तत्त्वज्ञान हा विषय प्रताप शेठ यांचा आवडता विषय होता.. गुरु सावळाराम नाईक यांच्या प्रेरणेने अद्वैत तत्त्वज्ञानाचा अभ्यास प्रताप शेठजी यांचा झाला… सावळाराम नाईक ह्या गुरूंच्या मार्गदर्शनाने तत्वज्ञान केंद्र सुरू झाले… भारतातील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे दुसरे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे केंद्र आहे… प्रताप शेठ यांच्या दानशूरतेतून अमळनेर शहरात शिक्षणाची गंगा आली… प्रताप शेठ हे दानशूर व्यक्तिमत्व होते… त्यांनी भारतातल्या अनेक संस्थांना दान दिले… गाडगेबाबांच्या चळवळीला प्रताप शेठ यांनी दान घेऊन योगदान दिलेले आहे… अनेक देवस्थाने यांनाही प्रताप शेठजी यांनी दान दिले.. प्रताप महाविद्यालयात पुण्याहून नामांकित प्राध्यापकांना प्राचारण करून शिक्षणाची ज्योत येथे पेटविली… प्रत्येकामध्ये दान देण्याची दानत नसते… जैन समाजाचे संस्कार असलेला व्यक्ती गुरुजी सावळाराम नाईक यांच्या पेरणेने अद्वैत तत्त्वज्ञानाकडे वळतो हि भारतीय तत्त्वज्ञानाची महानता होय.. तत्त्वज्ञान हा सर्व ज्ञानाचा पाया आहे… प्रताप शेठ यांनी फार मेहनत घेऊन तत्त्वज्ञान केंद्र स्थापन केले… एखाद्या व्यापारी दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीने तत्त्वज्ञानाची आवड असल्यामुळे तत्त्वज्ञानाला प्राधान्य दिले… प्रताप शेठ यांच्या कार्याची महती ऐकून सर्वपल्ली राधाकृष्णन अमळनेर मध्ये आले होते… तत्त्वज्ञान विषयाबाबत अनेक पुस्तके पाहून तत्त्वज्ञान केंद्राचे कौतुक केले… तत्त्वज्ञान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोकणातून पांडुरंग सदाशिव साने यांनी अमळनेर येऊन विद्यार्थ्यांची सेवा केली… अध्यापन केले त्यासोबत तत्त्वज्ञानाचे ज्ञान घेतले… प्रताप शेठ यांच्या अनमोल योगदानामुळे अंमळनेर मध्ये शिक्षणाची सुरुवात झाली… अमळनेर मधील ते प्रख्यात शिक्षण महर्षी होत… त्यांनी लावलेल्या रोपट्याला आता चांगलाच बहर आलेला आहे… प्रताप कॉलेज हे नामांकित कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे… प्रताप शेठ यांनी लावलेल्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झालेले आहे… त्यांनी लावलेल्या या शिक्षण संस्थांमध्ये साने गुरुजी यांचा ध्वनी व प्रताप शेठ यांची कष्ट याचा मंजुळ आवाज तेथे कायम गुंजत असतो… तत्त्वज्ञान केंद्रासाठी अनेक तत्त्ववेते अमळनेर येऊन गेले… प्राध्यापक जी .आर. मलकानी यासारखे लोक तत्त्वज्ञान केंद्रात अध्यापन करून गेले.. साने गुरुजी व प्रताप शेठजी त्याचप्रमाणे सावळाराम यांच्या बद्दल अभ्यासकांना डॉक्युमेंटरी फिल्म सारखे हवे अशी अपेक्षा अभ्यासकांना आहे… साने गुरुजी ज्या भूमीमध्ये राहिले त्यांच्याबद्दल पुस्तके उपलब्ध होत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.. प्रताप शेठ यांना भावपूर्ण आदरांजली
पत्रकार
एस .एच .भवरे
९०७५४१७०३२

