सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय…. डॉ.रवींद्र भोळे   ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे महाराज ,अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे ह्यांना दिव्यरत्न पुरस्कार प्रदान
1 min read

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय…. डॉ.रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे महाराज ,अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे ह्यांना दिव्यरत्न पुरस्कार प्रदान

Loading

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय…. डॉ.रवींद्र भोळे

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे महाराज, अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे ह्यांना दिव्यरत्न पुरस्कार प्रदान
गुजरात वडोदरा: गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा, दिव्यांग विश्व दिन निर्मित संस्थेच्या वतीने येथे विश्व दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. ह्यावेळी राष्ट्रीय राज्यस्तरीय स्तरावर राष्ट्राच्या हितासाठी विविध क्षेत्रात रचनात्मक कार्य करणाऱ्या 108 कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल दिव्य रत्न अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विश्व दिव्यांग दिवसानिमित्ताने रॅलीचे
आयोजनही करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे महाराज म्हणाले की गायत्री विकलांग मानव मंडळ द्वारा सरदार वल्लभाई पटेल अवॉर्ड कार्यक्रम म्हणजे राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचा उपक्रम आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी एकसंध भारत राष्ट्र ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी ज्ञानयोग, भक्तियोग , कर्मयोगाद्वारे राष्ट्रसेवा केली. अशा महान निष्काम कर्मयोगी सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावे दिव्य रत्न पुरस्कार म्हणजे एक विभूती पूजेचा कार्यक्रम आहे. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने स्टॅच्यू ऑफ युनिटी निर्माण करून भारताचे पंतप्रधान पूज्य नरेंद्रजी मोदीह्यांनी सरदारांचे कार्य जगजाहीर करून सर्व राष्ट्राच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे खूप मोठे ऐतिहासिक राष्ट्रीय कार्य झाले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना स्फूर्तीचा जिवंत झरा सापडला आहे. सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. गेली पस्तीस वर्षापासून सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक , वैद्यकीय,दिव्यांग सेवा इत्यादी क्षेत्रातील महत्त्वपूर्व समर्पित भावनेने योगदान दिल्यामुळे हा पुरस्कार मला प्राप्त झाला ,त्यामुळे सामाजिक कार्याचे मूल्यमापन झाले आहे. गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा संस्थेचा मी अत्यंत ऋणी आहे. ह्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये 108 राष्ट्रीय कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक, दिव्यांग सेवक, वृक्षमित्र ,डॉ. रवींद्र भोळे, अमोल पाटील ,सौ किरण पाचपांडे यांनाही सरदार वल्लभाई पटेल दिवे रत्न अवॉर्ड स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा संस्थेच्या संचालिका श्रीमती रुक्मिणी देवी माहेश्वरी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी धावती भेट दिली. यामध्ये श्रीमती मनीषा बेन वकील मंत्री महिला व बालकल्याण विकास, सांसद श्री डॉ. हेमांग जोशी, बालकृष्ण शुक्ला विधायक, श्री धर्मेंद्र बापू विधायक, केपूर रोकडिया विधायक, गिरीश पटेल गायत्री परिवार, राजगोपाल जी मुंदडा, गिरीश भाई माहेश्वरी, बाबुभाई सी पटेल ,नितेश भाई पटेल ,उमेश भाई भुतडा, पूर्व संसद रंजनबेन भट्ट , विजयभाई शाह ,ललित भाई शाह ,डॉ. राजेश कोरांट ,डॉ. विजय शाह ,राजेश आयरे ,अनिल भाई शाह ,दीपक भाई माहेश्वरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, श्रीमती रुक्मिणी देवी माहेश्वरी संचालक, सुनील भाई शाह शिवलालजी गोयल, गजानन राठी, मुखराज दोषी प्रकाशभाई शाह यांनी केले. हा कार्यक्रम आंबे स्कूल , गीतांजली ऑडिटोरियम समा सावली रोड वडोदरा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ललिता जोगड यांनी केले. आभार प्रदर्शन गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा संस्थेच्या संचालिका श्रीमती रुक्मिणी देवी माहेश्वरी यांनी केले. या कार्यक्रमाला राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली ,गुजरात ,तसेच अनेक राज्यातून कार्यकर्ते आले होते.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *