१२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकणार तरुण कर्मचाऱ्यांचा पेन्शन जनक्रांती महामोर्चा  लाखो कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला एकवटणार
1 min read

१२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकणार तरुण कर्मचाऱ्यांचा पेन्शन जनक्रांती महामोर्चा लाखो कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला एकवटणार

Loading

१२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकणार तरुण कर्मचाऱ्यांचा पेन्शन जनक्रांती महामोर्चा

लाखो कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला एकवटणार

अमळनेर प्रतिनिधी
सविस्तर असे की महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर तरुण कर्मचाऱ्यांच्या वतीने पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून लाखो कर्मचारी या आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाले त्यांना 1982_84 ची जुनी पेन्शन लागू करावी या एकमेव मागणीसाठी हा पेन्शन क्रांती महामोर्चा होणार आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने वेळोवेळी अनेक मोठमोठे आंदोलने मोर्चे करण्यात आले आहेत व त्याचे फलित म्हणून आज मयत कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन लागू करण्यात आली आहे, परंतु शासनाने लादलेली एन पी एस/ यू पी एस अशा कोणत्याही योजना मान्य नसुन सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट 1982_84 ची जुनी पेन्शन जोपर्यंत लागू करण्यात येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना थांबणार नाही असा राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आवाहनावर लाखो कर्मचारी एकवटतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यानिमित्ताने संघटनेतर्फे प्रशासनास विनम्र आवाहन करण्यात येत आहे की तात्काळ राज्यातील सर्व तरुण कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. जळगाव जिल्ह्यातील सर्वच विभागातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे पेन्शन साठी होणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, सरचिटणीस श्री. विपिन पाटील, नाना पाटील, दिपक गिरासे, संदीप पाटील, यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जळगावच्या वतीने केले आहे.

*संघटनेने आजपर्यंतचे केलेले विविध आंदोलने*
मुंडन आंदोलन, जलसमर्पण आंदोलन आमरण उपोषण, महाअधिवेशन, कर्मचारी संप, यासारखे शेकडो आंदोलने लाखो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आजपर्यंत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केलेले आहेत.

*संघटनेने आजपर्यंत संघर्षातून मिळवलेले फलित*
१.मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना फॅमिली पेन्शन .
२.रुग्णता पेन्शन.
३.ग्रॅच्युईटी.
४.१० लक्ष सानुग्रह
५.नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेले परंतु पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *