सेबी मुंबई व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण
1 min read

सेबी मुंबई व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

Loading

सेबी मुंबई व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी

आधार संस्था आयोजित स्वामींनी प्रकल्पा अंतर्गत बचत गटातील 70 महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
सेबी मुंबई संस्थेचे CA राजेंद्र नेरपगार सर यांनी आर्थिक नियोजन, उद्योग–व्यवसाय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड तसेच गुंतवणुकीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या सत्काराने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

प्रशिक्षण सत्रासाठी प्रो. विजयकुमार वाघमारे, डॉ. भारती पाटील, व रेणू प्रसाद यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांना विविध आर्थिक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश महाजन, उर्जीता शिसोदे, व भावना सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक शिस्त, गुंतवणुकीची दिशा आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाची महत्त्वपूर्ण समज मिळाल्याचे सहभागी महिलांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *