जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती : आरोग्य जागृतीची नवी दिशा!
1 min read

जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती : आरोग्य जागृतीची नवी दिशा!

Loading

 जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती : आरोग्य जागृतीची नवी दिशा!

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती उपक्रमांतर्गत आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय, अमळनेर जिल्हा जळगाव आणि रुक्मणी ताई कला वाणिज्य महिला महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक प्रभावी आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

रेड रिबन क्लबच्या माध्यमातून युवतींमध्ये एचआयव्ही/एड्स विषयक मार्गदर्शन, सावधगिरी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच गुप्तरोगावरील माहिती याबाबत सविस्तर व्याख्यान घेण्यात आले. सहभागी विद्यार्थिनींना समजून घेता येईल अशा संवादात्मक पद्धतीने IC Activity आयोजित करण्यात आली.

पियर एज्युकेटर आणि महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद यांच्या उपस्थितीत गट बैठक घेऊन आगामी वर्षातील जनजागृती कार्यक्रमांची सविस्तर आखणीही करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबतची सजगता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली.

“एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ… नव परिवर्तन घडवू!”

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात जागरूकतेची नवी ऊर्जा निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *