माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण*
1 min read

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण*

Loading

*माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण*

जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जळगाव द्वारा जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी जि प शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना साखळी उपोषणाबाबत निवेदन दिले आहे. त्या निवेदनामध्ये सत्यजित दादा तांबे विधान परिषद सदस्य यांचे समवेत झालेल्या सभेचे इतिवृत्त, शैक्षणिक व्यासपीठा सोबत दि.२-७-२०२५ च्या सभेतील निर्णय, शैक्षणिक व्यासपीठाने विविध विषयांबाबत दि.६-११-२०२५ रोजी दिलेली सात पत्रे, शैक्षणिक व्यासपीठाने दि.१-१२-२०२५ रोजी दिलेली तीन पत्रे.
वरील चार मुद्द्यांचा संदर्भ घेऊन
जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने आपल्याशी चर्चा करण्यात येत असून पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु आपणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आपण आम्ही मागितलेली माहिती देत नाही आपण चर्चेमध्ये मान्य केलेली प्रकरणे सुद्धा मंजूर करीत नाहीत वेतन पथकाकडून अपूर्ण माहिती दिली जाते आपण कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहत नाहीत कार्यालयीन कामकाज कार्यालयातून न करता इतर ठिकाणाहून केले जात आहे जिल्हाभरातून कामासाठी आलेले शिक्षक तासंताच दिवसभर आपल्या कार्यालयामध्ये ताट कडून आपली वाट बघत असतात. कोणीही जबाबदार अधिकारी त्यांची दखल घेत नाही. आपल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात दप्तर दिरंगाई दिसून येत आहे. टप्पा अनुदान आदेश वाटपात प्रचंड विलंब केला जात आहे. आपण माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहात. अनेक प्रकरणांबाबत आपले अडवणुकीचे धोरण दिसून येत आहे. म्हणून आम्ही आपल्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर २०२५ पासून साखळी उपोषण आयोजित करीत आहोत. जोपर्यंत परिपूर्ण माहिती व प्रलंबित प्रकरणे पूर्ण होत नाही‌ तोपर्यंत आमचे साखळी उपोषण सुरू राहील. अशा आशयाचे पत्र अध्यक्ष जे के पाटील, समन्वयक एस डी भिरुड, बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील, जयवंतराव पाटील, एच जी इंगळे, साधना लोखंडे, नंदन वंळीकर, शैलेश राणे, सुनील सोनार, सुनील गरुड,प्रदीप साखरे, अजय देशमुख, प्रदीप तळवेलकर, राजेश जाधव, योगेश भोईटे, संदीप डोलारे, संजय निकम, आर धनगर,प्रवीण वाणी,सुनील तायडे, सिद्धेश्वर वाघुळदे, अरुण सपकाळे, हरीश तळेले , आर एच बाविस्कर,यु यु दादा पाटील, संभाजी आप्पा पाटील, सी सी वाणी, सौ पुष्पा पाटील यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *