महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड.
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड.
धुळे प्रतिनिधी
राज्यभरात शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यां साठी प्रामाणिक पने काम करणारी संघटना म्हणुन नावारूपाला आलेली व कोणत्याही अपेक्षेशिवाय हजारो शिक्षकांना न्याय देणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. काल झालेल्या संघटनेच्या मिटिंग मध्ये भविष्यात संघटनेसाठी राज्य स्तरावर, विभाग स्तरावर व जिल्हा पातळीवर शिक्षक, कर्मचाऱ्यां साठी तळमळीने व धडाडीने काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना/कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या कार्याची दखल घेत संघटनेत विविध वरिष्ठ पदांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
संघटनेच्या राज्याध्यक्ष मा.सौ शुभांगी ताई पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत त्यांची पुढील पाच वर्षासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये
धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी माध्यमिक विद्यालय मोरदड चे मुख्याध्यापक राजेंद्र देविदास भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बोरविहीर हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री किरण पद्मोर सर यांची धुळे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
विभाग स्तरावर ज्युनिअर कॉलेज विभागाचे नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून, ज्युनिअर कॉलेज जखाने चे प्रा महेंद्र सुभाष बच्छाव यांची निवड करण्यात आली आहे तर उर्दू विभागाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून शैयदा उर्दू हायस्कूल मालेगाव चे प्रमुख लियाकत अली शैयदा मो. हुसैन शैयदा सर यांची नियुक्ती करण्यात आली. आदिवासी विकास आश्रम शाळा विभागा च्या विभागीय अध्यक्ष पदी शासकीय आदिवासी आश्रम शाळा सुकापूर ता साक्री चे प्रदीप रमेश देसले सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी जी आर पाटील माध्यमिक विद्यालय गिधाडेचे श्री निखिल मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उर्दू विभाग नाशिक ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष पदी मदर आयशा हायस्कूल चे शेख नदीम शेख मुजम्मिल सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जी आर हायस्कूल गिधाडे चे श्री जयेश मुरलीधर पाटील सर माध्यमिक विभाग शिरपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर किरण गजाननराव मारवडकर यांची अमळनेर तालुका अध्यक्ष व चौधरी सर यांची तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या या निवडीला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विवेक पाटील सर, राज्य कार्यकारणी सदस्य वसीम अन्सारी सर, राज्य संघटक प्रदीप चव्हाण सर मार्गदर्शक ॲड विवेक सूर्यवंशी,प्रविण बाविस्कर सर यांनी अनुमोदन दिले.
संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यां प्रती कोणत्याही अपेक्षे शिवाय प्रामाणिक पने व सचोटीने न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक प्रविण बाविस्कर सर यांनी केले तर, श्री प्रकाश सोनवणे सर, लियाकत सर, महेश पवार सर आदी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. तर जयेश पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी पवन पाटील सर,मुख्याध्यापक पवार सर ,वसीम सर,पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे निवडीबद्दल शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

