अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 13 डिसेंबरला नागपूरमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन
1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 13 डिसेंबरला नागपूरमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 13 डिसेंबरला नागपूरमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती निर्णायक पावले उचलत आहे. दीर्घकाळापासून शासन दरबारी रखडलेल्या मागण्या मार्गी न लागताच, या कर्मचाऱ्यांचे संयमाचे वलय आता तुटू लागले असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समितीने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियम, धनतोली, नागपूर येथे एकत्र येऊन ठाम निर्धाराने धरणे आंदोलन करणार आहेत. सेविका–मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, वेतन व भत्त्यांमध्ये शासकीय पद्धतीचे सुधारित नियम लागू करणे, केंद्र सरकारने महागाईचा विचार करून मानधनात भरीव वाढ करणे, कामावर आधारित प्रोत्साहन भत्त्याची सक्ती रद्द करून ते मासिक मानधनात सरसकट समाविष्ट करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची अंमलबजावणी करणे, सेवासमाप्तीनंतर पेन्शन लागू करणे, तसेच FRS प्रणालीतील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करणे – अशा जीवनमानाशी संबंधित महत्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारले जात आहे.
याशिवाय, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित अदा करणे आणि पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देणे या मागण्यांनाही विशेष महत्त्व आहे.
या इतिहास घडवणाऱ्या आंदोलनासाठी अंगणवाडी कर्मचारी एकदिलाने पुढे यावेत, धरणे आंदोलन भक्कमपणे यशस्वी करावे, असे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक श्री. युवराज बैसाणे, संजय मापले, जयश्री वाबळे, रामकृष्ण बी. पाटील, पूनम निंबाळकर, गोवर्धन मिसाळ, रेखा चव्हाण, चंदा नवले आणि सत्यभामा रंगारी, राजू पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *