विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध निघाला अमळनेरचा पहिला महाआंदोलन – मोर्चा , दै. ग्लोबल महातेजने पुकारलेल्या एल्गारला विद्यार्थिनींसह विविध संघटनांचा पाठिंबा
1 min read

विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध निघाला अमळनेरचा पहिला महाआंदोलन – मोर्चा , दै. ग्लोबल महातेजने पुकारलेल्या एल्गारला विद्यार्थिनींसह विविध संघटनांचा पाठिंबा

Loading

विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध निघाला अमळनेरचा पहिला महाआंदोलन – मोर्चा

दै. ग्लोबल महातेजने पुकारलेल्या एल्गारला विद्यार्थिनींसह विविध संघटनांचा पाठिंबा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे विद्यार्थिनींच्या रोज होणाऱ्या छेडखानी आणि गुंडांची हल्लेखोरी यामुळे काही अघटीत व अप्रिय घटना होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी, ठोस आणि कठोर प्रतिबंधकात्मक कारवाई व्हावी, यासाठी शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता धुळे रोडवरील साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणातून महाआंदोलन मोर्चा निघून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध अशा प्रकारे निघालेला हा शहरातील पहिला मोर्चा होता.
ग्लोबल महातेज विविध ज्वलंत समस्यांवर सातत्याने लक्ष ठेवतो आणि फक्त बातम्यांपुरती मर्यादित न राहता समस्यांवर तक्रारी करून निराकरणासाठी प्रयत्नही करतो. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींच्या छेडखानीबाबत अनेक पालकांनी महातेजकडे गंभीर तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे दै. ग्लोबल महातेजने या विरोधात भव्य जनआंदोलन उभारण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्था आणि विविध पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
मोर्चाचा प्रारंभ साने गुरुजी शाळेतून झाला. येथे उपस्थित विविध शाळा व महाविद्यालयातील शेकडी विद्यार्थिनींना श्रीमती स्नेहा एकलमे, संदीप घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे आणि डॉ. डिगंबर महाले यांनी मनोबल वाढविणारे प्रबोधन व मनोगते व्यक्त केले.
सर्वांनी ‘खरा तो एकची धर्म’ या घोषवाक्याखाली शिस्तीने मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर नेला. यावेळी फार्मसी महाविद्यालय, सुमन क्लासेस, साई इंग्लिश अॅकेडमी, साटोटे मॅथ्स क्लासेस, साने गुरुजी विद्यालय, राजमुद्रा इंग्लिश क्लासेस, प्रफुल्ल कॉमर्स अॅकेडमी, आयकेडी मॅथ्स अॅकेडमी, सरस्वती इंग्लिश क्लासेस,जाधव इंग्लिश क्लासेस अमळनेर, माऊली मॅथ्स क्लासेस, विद्या क्लासेस, एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल, सॉफ्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन, द्रौ. रा. कन्या शाळा आणि प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, खानदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, ख्यातनाम बिल्डर्स ओमप्रकाश मुंदडा,डॉ अनिल शिंदे, कल्याण पाटील, डॉ. अनिल शिंदे, हरी वाणी, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, श्रीमती माधुरीताई पाटील, खासगी क्लासेस संघटनेचे अध्यक्ष अॅड. भय्यासाहेब मगर, जाधव क्लासेस चे संचालक विनोद जाधव,
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, बन्सीलाल भागवत गुरुजी, गजेंद्र साळुंखे, द्रौ. रा. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सिमा सूर्यवंशी, प्रा. डी. डी. पाटील, म. वा. मंडळाचे संचालक डॉ. महेश पाटील, अॅड. विवेक लाठी, रावसाहेब पाटील, ग्लोबल स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण आणि आयकेडी मॅथ्स क्लासेसचे संचालक किरण महाजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *