तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज
![]()
तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज
भागवताचार्य कमलेश महाराज
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही, अशी खंत एच.आर.ए. महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज यांनी व्यक्त केली.
महाराज म्हणाले की, तालुक्यात साने गुरुजींच्या शिक्षणसेवेची परंपरा आहे. संत सखाराम महाराजांची समाधी, तसेच विप्रो कंपनीसारखी औद्योगिक संस्था असूनही अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहून रोजगार निर्मितीसाठी ठोस प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाडळसरे धरणाचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, धरणाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. आता जरी काम सुरू झाले असले तरी ते पूर्णत्वाला गेलेले नाही. धरण जलदगतीने पूर्ण झाल्यास अमळनेरसह आसपासच्या गावांना पाणीपुरवठा व शेती विकासाचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
कमलेश महाराज यांनी तरुणांच्या भविष्याचा विचार करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विकासासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.

