पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला  दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!
1 min read

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!

Loading

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला

दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
जयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत दत्त भक्तांचा जोश, ढोल-ताशांच्या गजरात झालेले स्वागत प्रभागाचे आयोजन यामुळे परिसर दत्तमय झाला.
या सर्व कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जयंत पाटील, लताबाई पाटील, सिद्धांत पाटील आणि पूजा पाटील यांनी केले.
रात्री दत्त जन्मोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध शिव कीर्तनकार, शिव व्याख्याते ह.भ.प. हातेड गलवाडेकर व ह.भ.प. माधुरीताई पाटील यांचे प्रभावी कीर्तन आयोजित करण्यात आले. कीर्तनातून समाज प्रबोधन, भक्ति आणि आदर्श जीवनाचा संदेश देण्यात आला. स्त्री-पुरुष, तरुण वर्गांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मंडपाचे सभागृह भरून गेले.
दिनांक ५ डिसेंबर रोजी महाप्रसाद व भंडारा आयोजित करण्यात आला. कॉलनीतील अनेक महिला, पुरुष तसेच भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला.
जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कॉलनीतील संजय पाटकरी, मोहित पवार, विवेक पाटील, चेतन पाटील, भटू पाटील, विजू येवले, मयूर पाटील, सागर विसपुते,रविभाऊ पाटील यांच्यासह सर्व बंधू-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
दत्त जयतीचा भक्तिमय जल्लोष सर्वांच्या मनाला भावणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *