जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात
1 min read

जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात

Loading

जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात

 

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – जागतिक एड्स दिनानिमित्त (1 डिसेंबर 2025) राष्ट्रविकास संस्था – मायग्रेंट T.I. प्रोजेक्ट, जळगाव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई), जिल्हा डापू विभाग आणि ग्रामीण रुग्णालय ICTC यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स पंधरवड्याची राज्यव्यापी जनजागृती मोहीम दणक्यात सुरू झाली. या उपक्रमाचा प्रमुख लाभ स्थलांतरित कामगारांना मिळणार असून एचआयव्ही/एड्स मोफत रक्त तपासणी, जनजागृती पोस्टर प्रदर्शन, तसेच संसर्गित व्यक्तींना जिल्हा एआरटी केंद्रात त्वरित रेफर करून नियमित औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

“Take The Rights Path” या घोषवाक्याशी सुसंगतपणे, एचआयव्ही संक्रमित व्यक्तींशी सहानुभूतीपूर्ण वागणूक, कामाच्या ठिकाणी योग्य मानधन व हक्क, सामाजिक स्वीकार आणि कलंक व भेदभावाचे निर्मूलन हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. राष्ट्रविकास संस्थेमार्फत जनजागृती रॅली, पथनाट्य सादरीकरण, माहितीपर कॅम्प यांचे जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार असून स्थलांतरित कामगारांना वेळोवेळी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम जळगाव येथे मा. वैशाली चव्हाण (निवासी उपजिल्हाधिकारी) आणि मा. किरण पाटील (सिव्हिल सर्जन, जळगाव) यांच्या उपस्थितीत सुरू झाला. या उपक्रमासाठी सातत्याने पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा. भूपेंद्र महाले, प्रकल्प प्रमुख तुषार पाटील, अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, मोजीम खान, शुभांगी पाटील तसेच स्थानिक ICTC विभागाचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

या उपक्रमाच्या यशामागे राष्ट्रविकास संस्थेच्या कार्यक्षम टीमचे नियोजन असून त्यात अमोल सूर्यवंशी (प्रकल्प व्यवस्थापक), धीरज दारोकर (समुपदेशक), सचिन चौधरी, दिलीप पाटील, राजेश्वर पाटील, राहुल सूर्यवंशी, गणेश पाटील, हिलाल पाटील, पवन सनसे, राहुल सोनवणे, उमाकांत बोरसे, पियुष पाटील यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच Dr. मैहफुज अली यांच्या मार्गदर्शनाखाली VPL टीममधील सुशिल केदरे, बिवास माहिती, शिवाजी लांडगे, राजेंद्र पाटील, प्रकाश जैन, किरण दास, नजीम पठाण, धरेन्द्र पाटील, गोरख पाटील, निलेश महाजन, सुमेध खरे, देवीदास पावरा, प्रथमेश जाधव हे सर्वजण कार्यक्रम सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *