जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश,  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर
1 min read

जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर

Loading

जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळा येथे समग्र शिक्षा अभियान गटसाधन केंद्र, पंचायत समिती पारोळा आणि चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष “जनजागृती रॅली” आयोजित करण्यात आली.
जि.प. शाळा क्र. 1 पासून सुरू झालेल्या या रॅलीला पदाधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब विश्वास पाटील (गट शिक्षण अधिकारी, पं.स. पारोळा), अण्णासाहेब सी.एम. चौधरी (विस्तार अधिकारी व शा.पो.आ. अधिक्षक, पारोळा), श्री संजय पाटील व श्री गिरीश वाणी (केंद्र प्रमुख), प्रमोद पाटील (तालुका समन्वयक), तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांचे सक्रिय योगदान रॅलीमध्ये दिसून आले. शिक्षक हेमंत महाजन, रामकृष्ण शेलकर, जगदीश सोनवणे, एस.एस. पाटील मॅडम, व्ही.एल. पाटील मॅडम, संगीता महाजन मॅडम, विवेक पाटील, कुणाल महाजन, हर्षल महाजन, दीपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागी झाले. याशिवाय गट साधन केंद्र, पंचायत समिती पारोळा व समग्र शिक्षा अभियान तसेच समावेशित शिक्षण उपक्रम येथील श्रीमती सुनंदा बडगुजर, नितेश निकम, सचिन खोंडे, भूषण पाटील, जितेंद्र वाघ, मनोज माळी, मीनाक्षी नेरपगार, राहुल भोसले हे कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, समावेशित शिक्षणाचे महत्त्व समजावणे आणि समाजातील नागरिकांना संवेदनशील बनवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला. विद्यार्थ्यांनी साजरा केलेला उत्साह आणि उपस्थितांचे प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *