अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष!
![]()
अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, मतदारांच्या मनात एकच चर्चा ठळक होत आहे —
“यंदाचा अमळनेरचा नगराध्यक्ष म्हणजे जितू ठाकूर!”
प्रभागनिहाय पाहिले तर जितेंद्र हरिश्चंद्र (जितू) ठाकूर यांच्या समर्थनार्थ निर्माण झालेली सकारात्मक लाट दिवसेंदिवस वेग घेतेय. सामान्य मतदार असो किंवा व्यापारी, तरुण असो किंवा महिला — सर्व स्तरांतून ठाकूर यांच्या नावाला मिळणारा प्रतिसाद ठाम आणि निर्णायक स्वरूपाचा दिसत आहे.
या वाढत्या लाटेमागे बळ देत आहेत अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतृत्व सध्या पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून, जितू भाऊंसह इतर नगरसेवक उमेदवारांना विजयी करण्यासाठी अक्षरशः कंबर कसली आहे.
आमदार अनिल पाटील यांचे प्रभागनिहाय काटेकोर नियोजन, बूथस्तरापर्यंत पोहोचलेले सक्रिय नेटवर्क, आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे जितू ठाकूर यांच्या उमेदवारीला विशेष गती मिळाली आहे. त्यात खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वातील महिला आणि युवक कार्यकर्त्यांची फळी सतत प्रचारात सक्रिय आहे.
शहरभर सुरू असलेल्या चर्चेचा सूर अगदी स्पष्ट —
“अनिल पाटील यांची रणनीती + पक्ष नेतृत्वाचे संयुक्त बळ = जितू ठाकूर यांचा विजय निश्चित!”
दरम्यान, साधेपणा, सहज उपलब्धता आणि अन्यायाविरुद्ध लढणारी ठाम वृत्ती यामुळे लोकसामान्यांमध्ये जितू ठाकूर यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ बनला आहे. पत्रकारितेतील कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढलेली अनेक लढाई आज मतदारांच्या स्मरणात ताजी आहे.
तरुणांचा उत्साह, महिलांचा सहभाग, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि विविध वस्त्यांतून उमटणारा आत्मीय प्रतिसाद — या सर्वांनी ठाकूर यांच्या प्रचाराला वेगळीच उंची दिली आहे.
शहरात घोषवाक्य भराभरा पसरत आहे —
“अमळनेर बदलूया… आणि आपल्याच माणसाला संधी देऊया!”
राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असतानाच एक गोष्ट मात्र निर्विवाद —
अमळनेरमध्ये बदलाचा प्रवाह निर्माण झाला आहे, आणि त्या प्रवाहाचा चेहरा म्हणजे ‘जितू ठाकूर’.

