प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरला दिसतोय”
![]()
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरला दिसतोय”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मध्ये ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ हा नारा जोरात घुमू लागला आहे. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील यांच्याभोवती अपक्ष नेतृत्वासाठी अभूतपूर्व एकीची लाट उसळली आहे.
महेश देशमुख हे शांत, संयमी, जमिनीवरचे आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून ओळखले जातात, तर नीलिमा पाटील महिलांचे, युवांचे आणि ज्येष्ठांचे प्रश्न तत्परतेने ऐकून तोडगा काढणारी सर्वसमावेशक नेत्री म्हणून लोकप्रिय आहेत. पाटील कुटुंबाची सामाजिक परंपरा आणि रवी पाटील यांची सातत्यपूर्ण सेवा या उमेदवारीला भरभरून बळ देत आहे. चर्चेत असेही सांगितले जाते की, सासू नगरसेविकेनंतर सुनेला संधी देण्यासाठी रवी पाटील यांनी स्वतः बाजूला होऊन पत्नीला प्राधान्य दिले.
प्रभागातील मतदारांचा नारा स्पष्ट आहे — रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, अंधारी ओपन प्लेस आणि सुशोभीकरणाच्या उणीवांवर खात्रीशीर उपाय हवा, आणि त्यासाठी महेश देशमुख व नीलिमा पाटीलच योग्य निवड आहेत.
प्रचारात महिलांची मोठी उपस्थिती, युवांचा उत्साह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे वातावरण अधिक तापले आहे. प्रत्येक गल्ली-बोळातून घोषणांचा जल्लोष ऐकू येतो —
“या वेळी ठरलं निश्चित… महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!”
शहरात एकच संदेश घुमत आहे — प्रभाग 16 मध्ये अपक्ष नेतृत्वाला मिळाली आहे जनतेची प्रचंड पाठिंबा लाट!

