डॉ बाविस्कर यांच्या उमेदवारीमुळे अमळनेर तालुका पुन्हा शिवमय होणार..
![]()
ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष!
डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा..
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
अमळनेर शहरातील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून शहराच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ढोल–ताशांच्या गजरात, ‘जय भवानी… जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाची विजयरॅली काढली.
माता-भगिनींनी डॉ. बाविस्कर यांचे औक्षण करून त्यांच्या उमेदवारीचा सन्मान व्यक्त केला. विविध प्रभागांत प्रचाराची दमदार सुरुवात झाली असून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही जनतेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
रॅलीनंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले—
“आमच्या बाविस्कर व सोनवणे परिवाराने सदैव समाजसेवेला प्राधान्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना माझ्यातील समाजकारणाची ओढ अधिकच दृढ झाली. अमळनेरच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी शिवसेनेतून राजकारणात आलो आहे. कारण शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण.”
ते पुढे म्हणाले की,
— शहरातील ८–१० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा नियमित करणे
— खडबडीत रस्त्यांचे तातडीने पुनरुज्जीवन
— इंदौरच्या धर्तीवर स्वच्छ व सुंदर अमळनेर घडवणे
ही त्यांची प्राधान्यक्रमातील कामे असतील.
“अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण धनुष्यबाणावर विश्वास ठेवा,” असे आवाहन त्यांनी शहरवासीयांना केले.
प्रचार फेरीत शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल महाजन, उज्वला महाजन, अपूर्वा चौधरी, सरिता पवार, राजेंद्र यादव, माया लोहरे, सुयोग धनगर, पुष्पाबाई पंकज, कैलास भावसार, भाग्यश्री मराठे, कल्पना शर्मा, पंकज चौधरी, प्रवीण पाठक, ज्योती शेटे, नीता कांबळे, शेख नवीद, बहारे रामसिंग, पूजा शिंदे, सुनील भामरे, मनीषा पाटील, श्रीराम चौधरी, सय्यद मिसबाह, गायत्री पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अमळनेरमध्ये शिवसेनेचा प्रचार वेग धरत असून ‘धनुष्यबाण’ची लाट अधिक जोमाने उसळताना दिसत आहे.
माजी आमदार शिरीष दादा चौधरी, हिरा उद्योग समूहाचे डॉ रवींद्र चौधरी यांची नियोजनबद्ध नियोजन व त्यांनी नगरपरिषदेमध्ये आपला घरातील एकही उमेदवार दिला नाही यामुळे अमळनेर शहरांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे व त्यांनी नगर परिषदेला नगराध्यक्ष पदासाठी वैद्यकीय क्षेत्रातला स्वच्छ पारदर्शक व्यक्ती दिल्यामुळे अमळनेर शहरातील सर्व व्यावसायिक वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची त्यांच्या नावाला पसंती आहे सध्या तरी अमळनेर तालुक्यातील शहरांमध्ये विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामध्ये लढत असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पण सध्या तरी डॉक्टर परीक्षित आपल्या परीक्षेमध्ये पास होतील अशीच चर्चा सुरू आहे


