अमळनेरमध्ये ‘जितू’ची जोरदार लाट! सर्व समाजाचा ठाम पाठिंबा — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूरच नाव आघाडीवर”
![]()
“अमळनेरमध्ये ‘जितू’ची जोरदार लाट!
सर्व समाजाचा ठाम पाठिंबा — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूरच नाव आघाडीवर”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झालेले वातावरण एकच गोष्ट स्पष्ट सांगत आहे — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूर यांना अभूतपूर्व असा सर्व समाजाचा, सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत आहे.
शहरभर सुरू असलेल्या चर्चेचा एकच सूर – “यंदा अमळनेरचा नगराध्यक्ष म्हणजे जितू ठाकूरच!”
स्थानिक पातळीवर जितू ठाकूर यांच्या समर्थनार्थ निर्माण झालेली सकारात्मक लाट दिवसेंदिवस वाढत असून, मतदारांचा झुकाव स्पष्टपणे त्यांच्याकडेच असल्याचे चित्र प्रभागनिहाय दिसत आहे.
यामागची एक महत्त्वाची बाब म्हणजे आमदार अनिल पाटील यांचे शिस्तबद्ध नियोजन आणि मजबूत कार्यकर्त्यांची संघटित फळी. प्रभागनिहाय तपशीलवार आखणी, बूथस्तरावरील काम आणि मतदारांशी थेट संवाद या सगळ्यामुळे जितू ठाकूर यांची उमेदवारी अधिक प्रभावी बनली आहे.
प्रभागांमध्ये एकच चर्चा —
“आमदार अनिल पाटील यांची रणनीती म्हणजे नगराध्यक्ष पदावर जितू ठाकूर यांची विजयश्री निश्चित!”
यात भर घालत आहेत खासदार स्मिताताई वाघ.
त्यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक आणि ज्येष्ठ नेते सध्या पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले असून, या एकत्रित शक्तीने जितू ठाकूर यांचा प्रचार अक्षरशः वेग पकडला आहे. त्यामुळे जनमताची दिशा त्यांच्या बाजूने झुकत असून, विजयानवर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र उमटू लागले आहे.
शहरातील राजकीय तापमान चढत असतानाच तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांचा प्रचार जनतेत अप्रूपाने स्वीकारला जात आहे. साध्या कुटुंबात जन्मून संघर्षातून उभे राहिलेले, पत्रकारितेतून अन्यायाविरुद्ध निडरपणे लढलेले आणि सर्वसामान्यांची बाजू सातत्याने मांडणारे जितू ठाकूर आज मतदारांच्या मनातील विश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
शहरातील विविध भागांत प्रचारादरम्यान तरुणांचा मोठा उत्साह, महिलांचा मनापासूनचा सहभाग, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि व्यापारी-शेतकरी-वस्तिनिहाय मिळणारा आत्मीय प्रतिसाद हे जितू ठाकूर यांच्या प्रतिमेला अधिक बळ देत आहे.
“आपल्यातील माणूस… सर्वांचा आधार!” ही छाप त्यांच्या नावाभोवती घट्ट होत चालली आहे.
जितू ठाकूर यांचा साधेपणा, कोणत्याही संकटात उपलब्ध राहण्याची वृत्ती, सर्वांना जोडून घेणारी शैली आणि पारदर्शक कामकाजामुळे आज जनता त्यांच्या रूपातील भविष्यातील जबाबदार नेतृत्व स्वीकारताना दिसत आहे.
“अमळनेर बदलूया… आणि आपल्याच माणसाला संधी देऊया!” हा नारा आज शहरभर उमटू लागला असून मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे स्पष्टच दिसत आहे.
अमळनेरमध्ये आता विकासाचा, विश्वासाचा आणि सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा एक नवा प्रवाह वाहू लागला आहे —
आणि तो प्रवाह स्पष्टपणे जितू ठाकूर यांच्याकडेच जाताना दिसत आहे.


