प्रभाग 16 अ साठी राजेश बापू पुन्हा उमेदवार – विकासाचा संकल्प पुढे!
![]()
प्रभाग 16 अ साठी राजेश बापू पुन्हा उमेदवार – विकासाचा संकल्प पुढे!
बातमी थोडक्यात:
अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 16 अ मध्ये माजी नगरसेवक राजेश बापू यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत पाठबळ मिळाले आहे. माजी नगरसेवक म्हणून त्यांनी रस्ते, गटारे, कम्युनिटी हॉल, पाणीपुरवठा व सोलर लाईट्ससह अनेक विकासकामे केली आहेत. आगामी काळासाठी त्यांनी प्रभागातील रस्ते, विज, ओपन प्लेस सुशोभिकरण व मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण यांसह ठोस विकास रोडमॅप जाहीर केला आहे. राजेश बापू म्हणाले, “ही माझी उमेदवारी नाही, हा प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे.” नागरिकांमध्ये त्यांचा विश्वास प्रचंड असून, पुन्हा विजयी होण्याची अपेक्षा आहे.

