दीपक पाटील यांच्यावर मध्यरात्रीचा गूढ हल्ला! शेतकरी बापासाठी जगणाऱ्या उमेदवाराची थरारक कथा…
![]()
मनाला चटका लावणारी घटना…
शेतकरी बापासाठी जगणाऱ्या उमेदवारावर मध्यरात्रीचा गूढ हल्ला!
अमळनेर प्रतिनिधी
मित्राच्या घरी फक्त “आई म्हणत होती… दिपक आपल्याला विसरला नसेल ना?” या एका मायेच्या शब्दासाठी जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील लगेच जेवायला गेले. मित्राची आई म्हणजे स्वतःचीच आई… ही भावना मनात ठेवून दिपक पाटील मोहाडीला पोहोचले. वातावरण घरगुती… प्रेमाने भरलेले.
मित्राने आग्रह करून सांगितले, “रात्री इथेच थांब, मी येतो तुला घेायला.”
दिपकजींनी मानही दिली.
पण उद्या सकाळी 7 वाजता धुळे येथे महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी आपुलकीनेच सांगितले — “मला आत्ता सोडून दे, वेळेवर पोहोचायचं आहे.”
दोघेही अंचलवाडी-मोहाडी मार्गे वाघोदे कडे निघाले.
रस्ता खड्डेमय, अंधार दाटलेला… तरीही ते हळूच येत होते.
परंतु अर्ध्या वाटेत नियतीने अचानक पलटी मारली!
मागून कोणीतरी अनोळखी व्यक्तीने हलक्या लाकडी वस्तूने दिपक पाटील यांच्या पाठीवर वार केला. क्षणभरात पायाने गाडीला जोरदार धक्का देत दोघांना खाली पाडले… आणि संशयित व्यक्ती रात्रीच्या अंधारात गायब झाले
वेळ – रात्री 11:30.
दाट अंधार, कोणी ओळखूही येत नाही…
दिपक पाटील वेदनेत असतानाही घाबरले नाहीत. तात्काळ वडिलांना फोन केला. वडिलांनी ताबडतोब येऊन त्यांना दवाखान्यात दाखल केले.
दिपक पाटील यांच्या पायाला, छातीवर व खांद्यावर दुखापती झाल्या.
परंतु मनोधैर्य?
ते अविचल!
त्यांच्या शब्दांत सांगायचे तर —
“हे मुद्दामहून केलेलं का? की कुणाचा कट? अजून काही समजत नाही. पण अडथळ्यांनी माझा मार्ग थांबणार नाही. वेळ वाया घालवण्यापेक्षा मी पुन्हा शेतकरी बांधवांसाठी घराबाहेर पडेन.
मी जागलो तरी शेतकरी बापासाठी… आणि मेलो तरी शेतकरी बापासाठी!
त्यांच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी आयुष्य झोकून देईन!”
हे बोलताना त्यांच्या आवाजात वेदना होती… पण त्याहून जास्त होती शेतकरी वर्गासाठीची निष्ठा.
दिपक पाटील म्हणाले —
“माझा संशय कोणावरही नाही. पण सत्य बाहेर येण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.”


शेतकऱ्यांसाठी जळणारे हे मन…
वेदनांवर मात करून पुन्हा मार्गावर उभं राहणारं हे धैर्य…
दिपक पाटील यांच्या या प्रसंगाने संपूर्ण परिसरातील जनतेला स्तब्ध केले आहे.

