अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…
1 min read

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…

Loading

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…

अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला नागरिकांसह विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असून तीन अपक्ष उमेदवारांनी लेखी पत्र देत आघाडीला पाठिंबा दिला आहे.
प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये संजय उत्तम पाटील यांच्या पत्नी रंजना संजय पाटील यांनी महिला राखीव पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच प्रभाग क्रमांक १५ अ मधील सर्वसाधारण पुरुष जागेसाठी भूषण विनेश निकम (पाटील) यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्या दोघांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार अनिल पाटील यांच्या विनंतीला मान देत त्या प्रभागातील उमेदवार जयश्री अनिल पाटील, विनोद मधुकर कदम, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर व आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

अपक्ष उमेदवाराने पाठिंबा देत केला पक्षप्रवेश…

प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवार इकबाल शेख यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार इमरान खाटिक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी इम्रान खाटिक, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, शहराध्यक्ष कलीम शेख, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दिवसेंदिवस वाढतेय आघाडीची ताकद…
अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या नेत्यांच्या विकासाच्या व्हिजनला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आता विविध समाजघटकासह अपक्ष उमेदवार ही जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यामुळे अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीची एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *