जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.*
![]()
*जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.*
जळगाव प्रतिनिधी
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जळगाव येथे बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत बाल विवाह मुक्त जिल्हा ची प्रतिज्ञा घेऊन बालविवाह मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना व नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “बाल विवाह मुक्त भारत” (BVMB) मोहिमेला २७ नोव्हेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. बाल विवाह मुक्त भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी हस्तक्षेपांची गती वाढविण्यासाठी 15 ऑक्टोबर ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत 100 दिवस कार्यक्रम व विविध उपक्रम जळगाव जिल्हाभरात राबविले जात असून विद्यापीठ, शाळा,महाविद्यालय,व ग्राम पातळीवर जाणीव जागृती, कॅण्डल मार्च,प्रभात फेरी कार्यक्रम घेतले जात असून जास्तीत जास्त बाल विवाह प्रतिबंध शपथ नागरिक,विद्यार्थी,प्रशासकीय कर्मचारी यांच्या सोबत घेण्यात येत आहे.तसेच कायद्याविषयी मार्गदर्शन संस्थेच्या वतीने केल्यात जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांनी बाल विवाह कायद्याविषयी तसेच बाल विवाहामुळे होणारे मुला-मुलीवर परिणाम यावर मार्गदर्शन केले.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाल न्याय मंडळचे सदस्य डॉ शैलेजा चव्हाण यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले,व आपल्या संबोधन भाषणातून समाजात बाल विवाह कसे कमी होऊ शकता यावर लक्ष केंद्रित करून ,शासन,प्रशासन सामाजिक संस्था,हे बाल विवाह प्रतिबंध साठी प्रयत्न करत आहेतच तरी काही प्रमानात् आपण कमी पडत असल्याचे नमूद केले,यासाठी आपण नियमित सातत्याने प्रशासनाने कठोर कार्यवाही केले पाहिजे.व या विषयी जास्तीत जास्त उपक्रम राबविले जावे समिती गठीत करून नियमित मार्गदर्शन झाले पाहिजे. यामुळे काही प्रमाणात बाल विवाहाचे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात आले.
मंचावर उपस्थित CDPO संपदा संत,यांनी बाल विवाहामुळे मुलीवर होणारे अत्याचार व पिडीत मुलीच्या समस्या मार्गदर्शन केले.तसेच आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक आनंद पगारे यांनी एक वर्षात बाल विवाह मुक्त भारत अभियान जळगाव जिल्हाभर कशा प्रकारे काम करत आहे.व ग्राम पातळीवर कशा प्रकारे विविध उपक्रमातून राबवून जाणीव जागृती केली जातेय,व प्रशासना सोबत कसे विवाह थांबविले गेले .हे PPT च्या माध्यमातून दाखविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी डॉ.किरण सुपे वैद्यकीय अधिकारी. अहिरे PSI शनिपेठ पोलिस स्टेशन. माधुरी बोरसे एपीआय एमआयडीसी पोलीस स्टेशन, जयश्री पवार प्रांत कार्यालय जळगाव. अतुल सोनवणे, माहिती अधिकार वरिष्ठ सहाय्यक, विजय सोनवणे,समन्वयक चाइल्ड हेल्प लाइन कुणाल शुक्ला,निलेश चौधरी,प्रसन्न बागल,जयश्री पाटील, आयशा तडवी समन्वयक एस बी सी 03 मुंबई कार्यक्रमास, अर्चना पारखे अंगणवाडी सेविका, चैताली पाटील अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.तसेच आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील,निवेदिता ताठे,प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान अहिरे, सुनील हिवाळे, भाग्यश्री सोनवणे, तोशिप शेख,योगिता पाटील, स्मिता भोगे, सरोज बाविस्कर, मीना महाजन, मयूर पवार, सूत्रसंचालन विद्या सोनार यांनी केले. व आभार प्रदर्शन मुरलीधर बिरारी यांनी केले.

