अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे आज मेळाव्याचे आयोजन
1 min read

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे आज मेळाव्याचे आयोजन

Loading

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी):-
येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीतर्फे व्यापारी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन २८ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी किराणा व्यापारी असोसिएशन,
इलेक्ट्रिकल असोसिएशन,
पान मसाला दुकानदार,
बाजार समिती सर्व असोसिएशन ,
मोबाईल असोसिएशन ,
फुटवेअर असोसिएशन,
एजन्सी असोसिएशन,
फूलवाले असोसिएशन,
भाजीपाला असोसिएशन ,
जिनिंग असोसिएशन,
स्क्रॅप व्यापारी असोसिएशन,
फूट असोसिएशन,
कृषी सेवा केंद्र असोसिएशन,
वेंडर असोसिएशन,
कापड व रेडिमेड असोसिएशन,
ट्रान्सपोर्ट असोसिएशन,
मेडिकल असोसिएशन,
सराफ असोसिएशन,
सलून पार्लर असोसिएशन,
पॅथॉलॉजी असोसिएशन,
दूध डेअरी & प्रॉडक्ट असोसिएशन,
हॉटेल असोसिएशन,
बिल्डिंग मटेरियल असोसिएशन,
कटलरी दुकानदार असोसिएशन,
कन्स्ट्रक्शन असोसिएशन,
हार्डवेअर असोसिएशन,
इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन,
इतर उर्वरित सर्व असोसिएशचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर तसेच सर्व १८ प्रभागातील उमेदवार यावेळी उपस्थित राहतील.
सर्वच संघटनाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *