शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा
1 min read

शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा

Loading

शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा

 

अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी प्रचार मोहीम अधिक जोमाने पुढे नेत शहरातील विविध शैक्षणिक संकुलांना भेट दिली. २६ रोजी झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले.
नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जितेंद्र ठाकूर यांचा शहरभर प्रचाराचा झंझावात कायम आहे. गृहभेटी, कॉर्नर सभा आणि संवाद उपक्रमांद्वारे ते विकासाची त्रिसूत्री नागरिकांसमोर सविस्तरपणे मांडत आहेत.

शैक्षणिक संकुलांच्या भेटीदरम्यान कौशल्याधारित उपक्रमांवर भर देण्याबाबत आपले विचार मांडले. उपस्थितांनीही शहरातील शिक्षणविषयक गरजा व अपेक्षा व्यक्त केल्या. याचदरम्यान ठाकूर यांनी ओम शांती केंद्राला भेट देत महिला भगिनी, कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, सूचना व गरजा जाणून घेत त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र उपक्रम, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण यावर विशेष भर देणारे नियोजन उपस्थितांसमोर ठेवले.

या भेटीमध्ये त्यांनी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचा संकल्पनामा मांडत सर्व उमेदवारांना विजयी करून शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *