प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार”
1 min read

प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार”

Loading

 


“प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार”

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवार म्हणून दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही सध्या शहरातील चर्चेचा मुख्य विषय बनली आहे.

B.A., M.A., M.Sc., B.Ed. अशा भक्कम शैक्षणिक पात्रतेसह, तसेच टायपिंग, शॉर्टहँड आणि MS-CIT सारखी तांत्रिक कौशल्ये ही जोडून पूजा शिंदे सक्षम, सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असलेली उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. पारधी समाजाची कन्या म्हणून धैर्याचा वारसा आणि विवाहानंतर सिंधी समाजाशी जोडलेली सांस्कृतिक एकता यामुळे त्या दोन प्रभावी समाजांना एकत्र आणणारे व्यक्तिमत्व ठरत आहेत, ज्यामुळे प्रभागात त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “लाडकी बहीण” योजनेचा अभ्यास, महिलांविषयीची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीमुळे महिला मतदारांत त्यांच्या नावाबद्दल सकारात्मकता वाढलेली दिसते. पूजा शिंदे म्हणतात, “प्रभाग 3 माझ्यासाठी सेवा करण्याचं स्वराज्य आहे,” असे म्हणत त्या थेट जनतेशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या जात आहेत.

सेवाभाव, शिक्षणाची ताकद आणि विकासाची स्पष्ट दृष्टिकोन यांच्या जोडीमुळे पूजा रमेश शिंदे–सिंधी या प्रभाग 3 ‘अ’ मधील प्रभावी, सक्षम आणि परिवर्तन घडवणाऱ्या उमेदवार म्हणून नागरिकांच्या मनावर छाप सोडत आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *