प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी- पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी)
![]()
प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी-
पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी)
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही तरुण, उच्चशिक्षित आणि सेवा भावनेने प्रेरित उमेदवार सध्या शहरातील चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.
B.A., M.A., M.Sc., B.Ed अशी भक्कम शैक्षणिक पात्रता, तसेच टायपिंग, शॉर्टहँड आणि MS-CITचे तांत्रिक कौशल्य या जोडीने पूजा शिंदे सक्षम, सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असलेली उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.
पारधी समाजाची कन्या म्हणून आलेला धैर्याचा वारसा आणि विवाहानंतर सिंधी समाजाशी जोडलेली सांस्कृतिक एकता यामुळे त्या दोन प्रभावी समाजांना एकत्र आणणारे व्यक्तिमत्व ठरत आहेत. त्यामुळे त्यांना प्रभागात व्यापक पाठिंबा मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “लाडकी बहीण” योजनेचा अभ्यास, महिलांविषयीची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीमुळे महिला मतदारांत त्यांच्या नावाबद्दल सकारात्मकता वाढलेली दिसते. “प्रभाग 3 माझ्यासाठी सेवा करण्याचं स्वराज्य आहे,” असे म्हणत त्या जनतेमध्ये थेट संवाद साधत आहेत.
सेवाभाव, शिक्षणाची ताकद आणि विकासाची स्पष्ट दृष्टिकोनामुळे पूजा रमेश शिंदे–सिंधी या प्रभाग 3 ‘अ’ मधील प्रभावी, सक्षम आणि परिवर्तन घडवणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

