“लोकप्रिय समाजसेवी डॉ. परिक्षीत बाविस्कर यांची उमेदवारी, नागरिकांच्या अपेक्षांची नवी लाट”
![]()
अमळनेर नगरपरिषद मध्ये अनुसूचित जमाती चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले आणि या पदासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर (M.D.medicin) या उच्च विद्या विभूषित उमेदवाराचे नाव पुढे आले.
अत्यंत स्पर्धा असलेल्या या निवडणुकीत लोक पसंती असलेला हा उमेदवार नेत्यांच्या डोळ्यापुढे आला आणि त्यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गट यांचे मार्फत जाहीर झाली. सुरुवातीला काहीशा एकतर्फी वाटणार्या नगराध्यक्ष निवडणुकीत खऱ्याअर्थाने चुरस निर्माण झाली.
डॉ.परिक्षीत बाविस्कर यांचा जन्म अमळनेर च्या कासार गल्लीतील ईच्छा देवी चौकात झाला..या चौकात त्यांचे बालपण रमले.. टाऊन हॉल येथील नवीन मराठी शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले…त्या काळाच्या नवोदय विद्यालयातील एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण अमळनेर येथेच झाले..
त्यांचे वडील कै.श्रीराम बाविस्कर हे गट शिक्षण अधिकारी म्हणून अमळनेर कार्यरत होते.त्यांचे काका श्री. प्रल्हाद बाविस्कर हे शिक्षक पुढारी आणि प्रबोधन च्या चळवळीतील अग्रगण्य होते. त्यांनी नेहमी समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली ती तडीला नेली. त्यांचा वारसा या उमेदवाराला आहे. वैद्यकीय व्यवसायाचे निमित्ताने जळगावला त्यांनी दवाखाना टाकला परंतु गावाची नाळ त्यांनी जपलेली आहे .शेकडो रुग्णांवर त्यांनी सेवाभावी वृत्तीने उपचार केले आहे. विशेषत: corona काळात त्यांनी शेकडो रुग्णांवर औषधोपचार केले.
अमळनेर चा “बाविस्कर परिवार” हा उच्च शिक्षित, सामाजिक दायित्व, संस्कार ..नीतिमत्ता..अन् प्रामाणिक पणा जपणारा असा परिवार आहे.या 22 कर परिवारातून आलेला हा उमेदवार खऱ्याअर्थाने “भूमिपुत्र” आहे…
नगरपरिषदेच्या गेल्या 30,35 वर्षा चेक इतिहासात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या सारखा उच्च शिक्षित आणि समाजसेवि वारसा असलेला उमेदवार नगरपालिकेच्या राजकारणात आलेला नाही. ही बाब सुजाण,आणि सर्वसामान्य मतदारांना नक्किच त्यांचे प्रतिनिधित्व करायची संधी देणारी आहे. डॉ. बाविस्कर यांच्या माध्यमातुन नगरपरिषदेच्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांची भेट नागरिकांना मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
जाचक कर आकारणी,24×7 पाणीपुरवठा, रस्ते, बागा यांचा अभाव, साफसफाई वगैरे आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. परंतु लोकनियुक्त उमेदवारी असल्याने नागरिकांना यावेळी स्वतः च्या मनाजोगता उमेदवार निवडून देण्याची संधी आली आहे. त्यामुळे त्यांना वाढता पाठींबा दिसून येतो. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची योग्य व्यूहरचना पहाता डॉ. बाविस्कर यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसून येत आहे.

