आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरला दहा सुवर्णपदक…..*
![]()
*आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरला दहा सुवर्णपदक…..*
प्रतिनिधी (अमळनेर) :- दि.२३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथील अंधेरी येथे कॉम्बॅट मार्शल आर्ट्स असोसिएशन द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आली.यात अमळनेरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरातील मुला मुलींनी घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – स्वरांश किरण सूर्यवंशी, रेहांश हर्षल केले, तानी मुकेश पुरोहित, वेदांत भूपेंद्र वानखेडे, देव्यानी निवृत्तीनाथ पवार, तेजस्विनी विकास जाधव, सुकेशनी समाधान सपकाळे, सुशील सुनील करंदीकर, प्रज्ञा सुनील करंदीकर या खेळाडूंना सुवर्णपदक प्राप्त झाले. तसेच उपविजय झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – दिव्या विकास घोगले, रिशिका गुरु गोयार, गणेश संदीप पाटील, प्रणाली स्वप्नील पाटील, ह्रितिका स्वप्निल पाटील, मयूर दीपक पाटकरी, समन्तक देवेंद्र देशमुख, पूर्वी विलास कोळी, हितांश निंबा पाटील, उपासना कमलेश साळुंखे, प्रणव राजेंद्र पाटील यांनी रौप्य पदक जिंकले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर कास्यपदक मिळवलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – कैवल्य केशव पुराणिक, माही ब्रिजलाल दाभाडे, राजरत्न ध्रुवराज तायडे, कृष्णा केतन गोसावी, प्रशिक बाळासाहेब दोंदे
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमळनेरचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवविणारे खेळाडूंचा व प्रमुखमार्गदर्शक एस. वाय. करंदीकर सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!
मास्टर करंदीकर (9226785560)


