संविधानाच्या मूल्यांचा वारसा जपत—परिश्रम निवासी शाळेत उत्साहात संविधान दिन साजरा”
![]()
“संविधानाच्या मूल्यांचा वारसा जपत—परिश्रम निवासी शाळेत उत्साहात संविधान दिन साजरा”
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, वंजारी खुर्द (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अण्णासो डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर (संस्थापक अध्यक्ष) यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत विशेष शिक्षक श्री. रामकृष्ण शेलकर यांच्या नेतृत्वात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून देशाच्या लोकशाही मूल्यांना अभिवादन केले.
यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधान निर्माते यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या महान कार्याला विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव, जबाबदारीची भावना आणि लोकशाहीविषयी आदर आणखी दृढ झाला.

