“ज्ञान – मूल्य – जागरुकता: मुंदडा विद्यालयात ‘भारतीय संविधान, आपला अभिमान’ कार्यक्रम उत्साहात”
![]()
“ज्ञान – मूल्य – जागरुकता: मुंदडा विद्यालयात ‘भारतीय संविधान, आपला अभिमान’ कार्यक्रम उत्साहात”
अमळनेर प्रतिनिधी
श्री. नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर… या विद्यालयात… 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला… “भारतीय संविधान आपला अभिमान.”
26 नोव्हेंबर 1949…हाच तो दिवस ज्या दिवशी भारतीय संविधानचा स्विकार केला गेला. भारतीय संविधान आणि भारतीय संविधान आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संपूर्ण भारतात दरवर्षी हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे हा आहे.
त्या अनुषंगाने आज आमच्या शाळेत *”भारतीय संविधान, आपला अभिमान”* या थिम नुसार शाळेत चित्रकला स्पर्धा हत्तीव सेल्फी पाॅईंट… *I love Constitution* म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला…. शाळेचे पर्यवेक्षक श्री डी. एन. पाटील सर यांनी प्रतिमा पुजन करून कार्यक्रम सुरू झाला याप्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री सी. एस. पवार सर, श्री.एस.एच.पवार सर,श्री. एच. एम. पाटील सर, श्री. एच. बी. साळुंखे व श्री. डी. बी. पाटील,श्री.बी.बी.पाटील श्रीमती बोरसे मॅडम,श्रीमती पवार मॅडम, श्रीमती भामरे मॅडम, तसेच श्री.व्हि.एन.भाऊसाहेब, व श्री.प्रमोद पाटील ग्रंथपाल शिवाजी पाटील उपस्थित होते. श्रीमती भामरे मॅडम यांनी संविधान दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले…श्री. डी. एन पाटील सरांनी विद्यार्थ्यांना केले.श्री. एच. एम. पाटील सरांनी सूत्र संचालन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महिला शिक्षकांनी केले. म्हणून त्यांचे खुप खुप अभिनंदन…



