प्रभाग 16 ‘अ’ आणि 16 ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवारांची एकता – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!
1 min read

प्रभाग 16 ‘अ’ आणि 16 ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवारांची एकता – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!

Loading

प्रभाग 16 ‘अ’ आणि 16 ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवारांची एकता – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे. प्रभागातील नागरिकांची मानसिकता स्पष्ट आहे – “विकास हवा, समाधान हवा!” या भावनेने प्रभागातील प्रत्येक घर, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक मतदाराचे मन उत्साहित केले आहे. या भावनेतून खरे अपक्ष नेतृत्व म्हणून प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख (महेश बापू – चिन्ह छत्री) आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील – चिन्ह पंखा यांच्याभोवती जोरदार एकीची लाट निर्माण झाली आहे.

अपक्ष जोडीची ताकद आणि पार्श्वभूमी

महेश देशमुख (महेश बापू – छत्री)

शांत, संयमी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तत्पर धाव घेणारे.
प्रामाणिक, जमिनीवरचे आणि निस्वार्थी नेतृत्व.

सौ. निलिमा पाटील (रवी – पंखा)

महिलांच्या, युवांच्या आणि ज्येष्ठांच्या प्रश्नांवर मनापासून लक्ष देणारे. त्यांचे पती रवी पाटील हे नेहमीच सामाजिक कामाला प्राधान्य देतात नीलिमा पाटील यांच्या सासू या माजी नगरसेविका आहेत. घरामध्ये सामाजिक व राजकीय कार्याचा पगडा आहे
सर्वसमावेशक, सुसंस्कृत आणि विकासाला समर्पित व्यक्तिमत्त्व.
या जोडीची ताकद फक्त त्यांच्या स्वतःच्या कार्यशैलीत नाही, तर पारिवारिक संस्कृतीतूनही येते. निलिमा पाटील यांचे पती रवी पाटील प्रभागाला सतत सेवा देत आहेत. त्यांची आई हया माजी नगरसेविका होती आणि सामाजिक कार्याची परंपरा आता सुनेतून पुढे नेली जात आहे. या वेळी नगरसेविकेची उमेदवारी सासूंपासून सुनेला देणे या पारंपरिक मूल्यांमुळे प्रभागात अपक्ष उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.

मतदारांचा सूर: विकास आणि समाधानाची अपेक्षा

प्रभाग 16 मध्ये नागरिक अनेक वर्षांपासून अनुभवत असलेल्या समस्या खालीलप्रमाणे आहेत:

पाणीपुरवठ्याचा ताण,रस्ते,तुटलेल्या गटारी व नाले,अंधारकोपऱ्यातील ओपन प्लेस
सुशोभीकरणाच्या उणीवा
दैनंदिन भेडसावणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी
या प्रत्येक समस्येला समाधानकारक आणि दीर्घकालीन तोडगा हवा आहे. प्रभागातील मतदार ठाम विश्वासाने सांगत आहेत –
“विकास हवा, प्रगती हवा… आणि म्हणूनच महेश देशमुख – निलिमा पाटीलच योग्य निवड!”

 

प्रभावी प्रचार आणि जनतेचा उत्साह

प्रचारादरम्यान प्रभागातील वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे:

महिलांची मोठी उपस्थिती
युवांचा उत्साह
ज्येष्ठांचे मार्गदर्शन

या सर्वांनी प्रभागात विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. प्रभाग 16 च्या प्रत्येक भागात एकच नारा घुमतो –
“या वेळी ठरलं निश्चित – महेश देशमुख – निलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!”

अपक्ष उमेदवारांची ही जोडी प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेणारी, विकासासाठी समर्पित आणि पारदर्शक नेतृत्व असल्याचे स्पष्ट करते. प्रभागातील मतदार आता विश्वास, अनुभव आणि कामगिरीवर आधारित निर्णय घेण्यासाठी सज्ज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *