अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप साळी: प्रभाग 12 ‘ब’ चे उज्ज्वल भविष्य
1 min read

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप साळी: प्रभाग 12 ‘ब’ चे उज्ज्वल भविष्य

Loading

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप साळी: प्रभाग 12 ‘ब’ चे उज्ज्वल भविष्य

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर तालुक्यातील प्रभाग 12 ‘ब’ मध्ये नगरपरिषद 2025 च्या निवडणुकीसाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रताप छबुलाल साळी जोरदार प्रचार करत आहेत. प्रभागातील मतदारांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. प्रताप अण्णा हे फक्त प्रचार करत नाहीत, तर प्रभागातील लोकांच्या समस्यांना स्वतः लक्ष देतात, त्या नोंदवून योग्य तो उपाय योजतात.
अण्णासाहेब प्रताप साळी यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेलेला आहे. त्यांच्या वडिलांनी 1965 पासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
वृद्धांसाठी गार्डन, महिलांसाठी सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार यासारखे सामाजिक उपक्रम राबवले. माजी नगरसेवक असतांना त्यांनी प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. पाडळसरे धरणासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःच्या रक्ताचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते, जे त्यांच्या समाजसेवेतील समर्पणाचे प्रतीक आहे.
साळी कुटुंब प्रभागातील जनतेमध्ये आदर्श मानले जाते. लहान बंधू दीपक आबा साळी अर्बन बँकेमध्ये संचालक असून, कुटुंबातील मुलं युवा उद्योजक आहेत. सामाजिक उपक्रम दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केले जातात, ज्यामुळे प्रभागातील लोकांशी सुमधुर नाते निर्माण झाले आहे. प्रताप अण्णा हे अत्यंत मितभाषी असून, सर्वधर्मसमभावाला महत्त्व देतात.
व्यवसायात त्यांनी लहानशा दुकानापासून सुरुवात करून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज तो वटवृक्षासारखा फुललेला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे 200–250 तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रभागातील तरुण पिढीला रोजगाराच्या संधी मिळतील. जातधर्म न पाहता, समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळावी यावर त्यांचा विशेष भर आहे.
प्रभाग 12 ‘ब’ चा विकास प्रताप अण्णा यांच्या दृष्टीकोनात आहे. ते प्रभागातील प्रमुख समस्या ओळखून त्यावर कार्यरत आहेत. या समस्यांमध्ये ओपन प्लेस सुशोभीकरण, गटारी रस्त्यांचे दुरुस्तीकरण, जिम आणि व्यायामशाळा, शाळा उभारणी, समाजाचे मंगल कार्यालय यांचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रभागातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली जातील.
प्रताप अण्णा हे बुद्धीजीवी, अभ्यासू आणि मितभाषी नेते आहेत. प्रभागातील मतदार त्यांच्यावर अत्यंत विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचे सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा बाळगतात. त्यांचा प्रचार हे फक्त जनसंपर्क नाही, तर लोकांच्या समस्या समजून घेण्याचा मार्ग आहे, ज्यामुळे प्रभागातील जनतेमध्ये त्यांच्यासाठी प्रचंड आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग 12 ‘ब’ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रताप अण्णा हे सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून विकासकार्य करतील. मतदारांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन प्रभागाच्या विकासाला नवे आयाम द्यावे, असा प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त मत आहे. प्रताप छबुलाल साळी हे विश्वासू, कार्यक्षम आणि समाजाभिमुख नेता असून, प्रभाग 12 ‘ब’ च्या भविष्यासाठी आदर्श उमेदवार ठरतील, असा मतदारांचा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *