पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न…*
![]()
*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न…*
अमळनेर दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अस्मिता सरवैया यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संविधान गौरव दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण केले. संविधान गौरव दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून धनदाई महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा पावरा सर, मारवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा डॉ पाटील सर, एरंडोल महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा डॉ चिकाटे मॅडम, धरणगाव महाविद्यालयातील प्रा. डॉ संजय शिंगाने सर उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनी यामिनी माळी, गायत्री बोरसे, निकिता कंवर यांनी संविधान गीत गायन केले. तसेच अमळनेर परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधान जागर कार्यक्रम राबविला. यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा विजय कुमार वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांनी उपस्थितांना संविधानाची उद्देश पत्रिकेचे वाचन केले, त्यांच्यासोबत उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी संविधान गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि भारतीय संविधान हा लोकशाहीचा खरा आत्मा आहे हे अनेक उदाहरण देऊन स्पष्ट केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ अनिता खेडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन केले व आभार प्रदर्शन व्यक्त केले. महाविद्यालयातील क्रीडा अधिकारी प्रा डॉ श्वेता वैद्य, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा डॉ एस आर चव्हाण, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

