गुन्ह्यांची कटकारस्थानं जवळच्या माणसापासूनच होत असतात….शंकर शेळके*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५१ वा विचारमंथन मेळावा संपन्न…आय कार्ड,नियुक्ती व सन्मानपत्र वितरण…सभासद सहकार्यातील साउंड सिस्टीमचा शुभारंभ*  *शहिद जवान व दिल्ली बॉम्बस्फोट व विविध बळींसह पत्रकार स्व.नि‌.ग.पाटील यादवराव वक्ते,कुसूमताई मिश्रा यांना श्रध्दांजली*
1 min read

गुन्ह्यांची कटकारस्थानं जवळच्या माणसापासूनच होत असतात….शंकर शेळके* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५१ वा विचारमंथन मेळावा संपन्न…आय कार्ड,नियुक्ती व सन्मानपत्र वितरण…सभासद सहकार्यातील साउंड सिस्टीमचा शुभारंभ* *शहिद जवान व दिल्ली बॉम्बस्फोट व विविध बळींसह पत्रकार स्व.नि‌.ग.पाटील यादवराव वक्ते,कुसूमताई मिश्रा यांना श्रध्दांजली*

Loading

*गुन्ह्यांची कटकारस्थानं जवळच्या माणसापासूनच होत असतात….शंकर शेळके*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५१ वा विचारमंथन मेळावा संपन्न…आय कार्ड,नियुक्ती व सन्मानपत्र वितरण…सभासद सहकार्यातील साउंड सिस्टीमचा शुभारंभ*

*शहिद जवान व दिल्ली बॉम्बस्फोट व विविध बळींसह पत्रकार स्व.नि‌.ग.पाटील यादवराव वक्ते,कुसूमताई मिश्रा यांना श्रध्दांजली*

अकोला- ईतरबाबतित बोलणाऱ्या लोकांनी गुन्हेगारी क्षेत्राबाबतही चिंतन आणि दक्षता ठेऊन सावध झालं पाहिजे.कारण तपासणीत बहूतेक गुन्ह्यांच्या कटकारस्थानात जवळच्या लोकांचा सहभाग आढळलेला आहे.अवती भवती वावरणारी आणि कामाच्या ठीकाणची,तथा आप्तस्वकीयांमधील गुन्हेगार प्रवृत्तीच सर्व प्रकारचे पुरावे नष्ट करण्यासाठी बाहेरील दुरच्या लोकांची मदत घेऊन ही कामे करत असतात.यासाठी आपले व्यवहार,गुपितं सुरक्षित ठेवत जवळच्या लोकांपासूनही सावधानता बाळगली पाहिजे‌.अशा सावधगीरीच्या सुचनेचे महत्वपूर्ण आवाहन अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ५१ व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.याप्रसंगी धडक कारवाया आणि उल्लेखनिय तपास कार्याबध्दल त्यांचा केन्द्रीय गृहमंत्रालय दक्षता पदक,आंतरीक सुरक्षा व विशेष सेवा पदक आणि प्राप्त विविध बहूमानांबध्दल पत्रकार महासंघाकडून सन्मानचिन्ह शाल प्रदान करून गौरव करण्यात आला.यावेळी त्यांनी गेल्या अडिच वर्षात सर्व पत्रकार, मिडीयाकर्मींनी कोणतेही विरोधी वृत्तांकन न करता केलेल्या मौलिक सहकार्याबध्दल आभार व्यक्त केले.

आपल्या सहज मनोगतातून पुढे बोलतांना त्यांनी पत्रकार महासंघाच्या पत्रकारिता आणि सामाजिक उपक्रम व वाटचालीचा गौरव करून शुभेच्छा दिल्यात.त्यांनी जळगावमधील तत्कालीन मोठ्या बॕंक दरोड्यात एक मुंबईतील पि.एस.आय आणि त्याला मदत करणारा मेहुणा हा त्याच बॕकेचा चपराशी होता.या तपास कार्याबध्दल दक्षता पदक मिळाल्याचे व प्रत्येक घटनेत “माझ्यासोबतही असं घडलं असतं तर” हा विचार करून कर्तव्य बजावत असल्यानेच प्रभावी तपासकार्य घडत गेल्याचे त्यांनी सांगीतले. अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक व लोकस्वातंत्र्यच्या राष्ट्रीय पदाधिकारी देवकाताई देशमुख ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर वाशिमचे सामाजिक सेवाव्रती गिरधारीलाल सारडा,लोकस्वातंत्र्य संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, कादंबरीकार राष्ट्रीय पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती-इंगोले,समाजसेवक वसंतराव देशमुख,यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले.शहिद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला, अपघात व आपत्तीग्रस्त बळी तथा ज्येष्ठ पत्रकार स्व.नि.ग.पाटील, यादवराव वक्ते व कुसूमताई मिश्रा यांना याप्रसंगी सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.देवकाताई देशमुख यांच्याकडून श्रीमती वक्ते यांना साडी चोळी देण्यात आली.यावेळी अध्यक्षांसह प्रमुख उपस्थितांचे व मराठी सहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल तरूणाईच्या संदिप देशमुख यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.देवकाताई देशमुख यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून पत्रकारितेसोबत सामाजिकतेची जोड हा लोकस्वातंत्र्यचा उल्लेखनिय प्रवास असल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.पदाधिकारी श्रीकृष्ण माळी, नागोराव मोहोड व ईतर सभासदांना आयकार्ड व नियुक्तीपत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले.सभासद सहकार्यातून यापूर्वी घेतलेल्या खुर्च्या आणि पोडीयमनंतर घेतलेल्या नव्या साउंड सिस्टीमचा शुभारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,प्रा‌‌.राजाभाऊ देशमुख,अंबादास तल्हार, संदिप देशमुख,डॉ ‌शंकरराव सा़ंगळे,संतोष धरमकर,पंजाबराव वर,सागर लोडम,बुढन गाडेकर,मनोहर मोहोड,श्रीकृष्ण माळी, प्रा.डॉ.कल्पना थोरात, योगशिक्षिका मयूरी इंगळे,डॉ.किरण वाघमारे,संजय कृ.देशमुख,नासाहेब देशमुख,राजेश खारोडे (तेल्हारा)विजय देशमुख,सतिश देशमुख,नारायणराव अंधारे,नागोराव मोहोड,सुरेश पाचकवडे,अनंतराव महल्ले,एकनाथ पाखरे,सुरेश कुलकर्णी,गजानन थोरात,रमेश समुद्रे,फुलचंद वानखडे,अमित इंगळे,धारेराव देशमुख,गजानन वानखडे,रिध्दीका लूले,दिपक शिरसाट, डॉ.अशोक शिरसाट,पि‌.एस.देशमुख,अर्जूनराव घुगे, डॉ.गौरव देशमुख,अॕड.संकेत देशमुख,सुनिल दोड,अजय वानखडे,संजय देऊळकर,संतोष मोरे,गजानन मुऱ्हे,संदिप कुकडे, व अनेक पत्रकार उपस्थित होते.
संचलन प्रा.महादेव उर्फ देवबाबू लूले तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.शेवटी राष्ट्रगीत आणि सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *