बांभूळमुक्त प्रभागाची नवी सुरुवात! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख व निलीमा पाटील यांचा स्वच्छता उपक्रम गतीमान
![]()
बांभूळमुक्त प्रभागाची नवी सुरुवात! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख व निलीमा पाटील यांचा स्वच्छता उपक्रम गतीमान
अमळनेर प्रतिनिधी) –
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बाभूळ झाडांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. काटेरी झाडांमुळे रस्ते अडणे, संध्याकाळी वाढणारा अंधार, मुलांना होणारा त्रास, तसेच असुरक्षित वातावरण यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील भूमिपुत्र अपक्ष उमेदवार महेश देशमुख (16 “अ”) आणि निलीमा रवि पाटील (16 “ब”) यांच्याकडे या समस्येबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी मांडण्यात आल्या. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत दोन्ही उमेदवारांनी तातडीने JCB मशीन बोलवून मोठ्या प्रमाणावर बाभूळ व इतर काटेरी झाडे काढून परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवला.
या उपक्रमात दोन्हीही उमेदवारांनी स्वतः जागेवर उभे राहून कामाचे मार्गदर्शन केले. ओपन प्लेस, रिकामे प्लॉट्स, तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व काटेरी झाडांचे सफाईकाम वेगाने सुरू आहे. स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग हा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष कामातून सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
प्रभागातील काही ठिकाणी अजूनही सफाईची आवश्यकता असल्यास नागरिकांनी संकोच न बाळगता थेट संपर्क साधावा, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे.
📞 संपर्क:
रवि पाटील – 9423504252
महेश देशमुख – 9420111133
प्रभाग 16 मध्ये सुरू झालेल्या या ‘बांभूळ मुक्त’ मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुढील काळातही अशाच विकासकामी उपक्रमांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


