नगराध्यक्ष पदासाठी ठाम पाऊल – अमळनेर सोलर असोसिएशनने जितेंद्र ठाकूर यांना दिला अधिकृत पाठिंबा”
1 min read

नगराध्यक्ष पदासाठी ठाम पाऊल – अमळनेर सोलर असोसिएशनने जितेंद्र ठाकूर यांना दिला अधिकृत पाठिंबा”

Loading

नगराध्यक्ष पदासाठी ठाम पाऊल – अमळनेर सोलर असोसिएशनने जितेंद्र ठाकूर यांना दिला अधिकृत पाठिंबा”

अमळनेर प्रतिनिधी:- आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना आता अमळनेर सोलर असोसिएशनने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सचिन साळुंखे, प्रवीण शिंपी, बापू महाजन, निलेश वाघ, नामदेव शेळके, रहीम पिंजारी, सागर पाटील, निलेश चव्हाण, हर्षल धनुरे आणि रावेश पाटील यांनी व्यक्तिगत भेट घेऊन निवेदन देत ठाकूर यांना पाठिंबा दर्शविला.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले,
“जितेंद्र ठाकूर हे शहराच्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करणारे, प्रामाणिक आणि जनतेतून उभे राहिलेले उमेदवार आहेत. शहरातील सर्व घटकांचा विश्वास आणि पसंती त्यांना मिळत असून, आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर तेच विराजमान होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

या पाठिंब्यामुळे ठाकूर यांच्या उमेदवारीला प्रभागात अधिक शक्ती आणि सकारात्मक वातावरण मिळाले असून, शहराच्या विकासासाठी नागरिकांमध्ये उमेदवाराविषयी उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *