प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांचे एकच आवाहन – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना  विजयी करा!”
1 min read

प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांचे एकच आवाहन – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना विजयी करा!”

Loading

 

“प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांचे एकच आवाहन – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना विजयी करा!”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मधील विकासाचा नवा चेहरा म्हणून महेश देशमुख (16 अ) व सौ. नीलिमा (रवी) पाटील (16 ब) हे दोन्ही उमेदवार नागरिकांच्या प्रचंड पाठिंब्याने आघाडीवर आहेत.
“कालही सेवा – आजही सेवा – उद्याही निस्वार्थ सेवा” या तत्त्वावर पुढे सरसावलेले हे दोन्ही उमेदवार प्रामाणिक, पारदर्शक आणि जनतेसाठी नेहमी उपलब्ध राहणारे म्हणून ओळख मिळवत आहेत.

रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज, पायाभूत सुविधा या सर्व प्रश्नांची काळजी घेण्याची व प्रभागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची खात्री त्यांनी मतदारांना दिली आहे. प्रचारदौऱ्यात महिलांचा, युवांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून प्रत्येक ठिकाणी एकच नारा घुमत आहे—

“या वेळी महेश देशमुख – नीलिमा पाटील… प्रचंड मतांनी विजयी करा!”

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी दोन्ही उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन मतदारांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *