प्रभाग 16 च्या विकासासाठी जनआव्हान! – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा”
1 min read

प्रभाग 16 च्या विकासासाठी जनआव्हान! – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा”

Loading

प्रभाग 16 च्या विकासासाठी जनआव्हान! – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाची नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेले दोन उमेदवार, प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवार मतदारांच्या आशेचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
कै. पितांबर तात्या पाटील, सेवानिवृत्त बँक अधिकारी जेडीसी कै. पी.जी. आप्पा देशमुख, कै. सुनीताबाई प्रभाकर देशमुख आणि माजी नगरसेविका सौ. कमलबाई पितांबर पाटील यांच्या आशीर्वादाने—
“कालही सेवा, आजही सेवा आणि उद्याही निस्वार्थ सेवा”
याच तत्त्वावर प्रभागाचा विकास साधण्यासाठी ही नवी पिढी पुढे सरसावली आहे.

“लोकप्रतिनिधी नाही… आम्ही जनसेवक आहोत!” – उमेदवारांचा निर्धार

प्रभागातील प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येला प्रामाणिकपणे भिडण्याची आणि पारदर्शकतेने काम करण्याची हमी देत दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या मनात विश्वासाचा ठसा उमटविला आहे.
रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधा यापासून ते नागरिकांच्या दैनंदिन गरजांपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचा निर्धार दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग 16 ‘अ’ – महेश प्रभाकर देशमुख (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण)
प्रभाग 16 ‘ब’ – सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील (सर्वसाधारण महिला)
दोन्ही उमेदवार प्रखर सामाजिक भान, प्रामाणिक विचारसरणी आणि निष्ठा या गुणांनी सज्ज असून, प्रभागातील नागरिकांना नेहमी हाताशी असणारे ‘आपले’ प्रतिनिधी म्हणून उदयास येत आहेत.
“सामाजिक काम हे रक्तात असलं पाहिजे!” – मतदारांचा आवाज
प्रभागातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने सांगितले—
“ज्यांच्या घरात सेवाभाव संस्कारात आहे, त्यांच्याकडूनच खरा विकास घडतो. महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील हे दोघेही उमेदवार आपल्या प्रभागासाठी योग्य, सक्षम आणि काम करणारे नेतृत्व आहे.”

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रचारदौऱ्यात प्रचंड उत्साह – विजयाची चर्चा जोरात-
प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज झालेल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारदौऱ्यात महिलांचा, युवांचा आणि ज्येष्ठांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्ली–बोळ, प्रत्येक चौकात एकच घोषणा ऐकू येत होती—
“या वेळी महेश देशमुख आणि नीलिमा पाटील… प्रचंड मतांनी विजयी!”
प्रभागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, विकासाच्या वेगाला नवे पंख देण्यासाठी आणि जनतेला न्याय देणारा पारदर्शी कारभार घडवण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना मतदार बांधवांनी भरभरून पाठिंबा द्यावा, अशी सामूहिक भावना प्रभागात दृढ झाली आहे.
“मतदान रूपी आशीर्वाद द्या… आम्ही विकासाची हमी देतो”
मतदारांचा वाढता विश्वास आणि उमेदवारांबद्दलचा उत्साह पाहता, प्रभाग 16 मध्ये या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *