“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील”
![]()
“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील”
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
विद्याविहार कॉलनी प्रभाग 16 ‘ब’ मध्ये समाजकार्याचे दिग्गज रवींद्र पितांबर पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा हक्क मागे घेत महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पत्नी, सौ. निलिमा विश्वनाथ (रवी) पाटील, महिला राखीव पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.
रवी पाटील यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील महिला वर्गात उत्साहाची लाट पसरली असून, महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबाने नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असून, या पिढीच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास आता नवा वेग घेणार आहे.
सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक आता निलिमा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी उत्सुक आहेत. प्रभाग 16 ‘ब’ चा विकास आणि समस्यांचे निराकरण केवळ रवी भाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे, असा संदेश आता प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचला आहे.

