संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी :-
श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थिनी यामिनी माळी, गायत्री माळी, प्राजक्ता बाळासाहेब गौडे, मयुरी महेंद्र करंकाळ, रत्ना खैरनार व जान्हवी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिराव हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना संविधानाची मूलभूत तत्त्वे, अधिकार आणि कर्तव्यांची ओळख करून देत त्यांनी ज्ञानप्रबोधनाची सुंदर माळ रचली.
संविधान जागर अभियानाच्या श्रद्धा रेखा राजेंद्र यांनीही विद्यार्थ्यांना संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया आणि आजच्या समाजजीवनात संविधानाचे स्थान याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय.आर. महाजन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व विद्यार्थिनींना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी भूषविले.
या उपक्रमाचे त्यांनी मनापासून अभिनंदन व कौतुक करत, विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल माहिती दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
उपक्रमानंतर विद्यार्थ्यांनी संविधानासोबत सेल्फी घेऊन ज्ञानयात्रेची आठवण जपली.
या प्रसंगी शिक्षक आय.आर. महाजन, एच.ओ. माळी, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
—


