अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय  प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड
1 min read

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

Loading

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय

प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर:-येथील नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 8 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधून अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची माघार झाल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे तरुण उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा उमेदवार बिनविरोध झाल्याने सर्व उमेदवारांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.विशेष म्हणजे प्रथमच ते इच्छुक असताना शहर विकास आघाडीने तरुण वर्गाच्या आग्रहास्तव त्यांना उमेदवारी जाहीर केली होती,त्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी नगरसेवक विवेक पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली त्यांच्यासोबतच यतीन अशोक पवार यांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येत माघार घेतल्याने सचिन पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत.निवडीनंतर सचिन पाटील यांच्यासह समर्थकांनी आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या निवासस्थानी जाऊन जल्लोष साजरा केला.
यावेळी आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की सचिन पाटील यांनी सदैव नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले, त्यांच्या अडचणींच्या समाधानासाठी निस्वार्थीपणे धाव घेतली. त्यांची साधी स्वभावशैली, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि प्रभागातील सातत्यपूर्ण जनसंपर्काने त्यांना जनतेच्या हृदयातील नेता म्हणून स्थान मिळवून दिले. याचीच पावती म्हणून आज प्रभाग 8 अ मधील जनता एकमुखाने आपल्या प्रिय नेत्याला विजयी करून विकासाला नवी चालना दिली असून शहर विकास आघाडीवर दाखविलेला हा विश्वासच आहे.अमळनेर तालुका शहर विकास आघाडीला हा जनतेचा मजबूत पाठिंबाच असून
या अविस्मरणीय विजयाने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर, पारदर्शक नेतृत्वावर आणि जनहिताच्या राजकारणावर जनतेने ठेवलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा विजय आघाडीच्या विकासनितीला मिळालेली मोठी भरारी आहे अशी भावना आमदारांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *