संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”
1 min read

संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”

Loading

संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”

 

अमळनेर प्रतिनिधी:- येथील तालुका ठाकूर समाज सेवा संघाची बैठक संपन्न होऊन शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हेच आमचे उमेदवार असल्याचा एकमुखी निर्णय ठाकूर समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर उर्फ जितू ठाकूर यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. बहुसंख्य ठाकूर बांधव या बैठकीला उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी ठाकूर समाजाला न्याय दिला असून त्यांच्या निवडीचा मान ठेवत सर्व ठाकूर समाजाचा एकच उमेदवार म्हणून जितू ठाकूर यांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने उभे रहावे असे ठरविण्यात आले. सर्व समाज बांधवांनी मिळून जितू ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत रणजीत शिंदे यांनी घेतली माघार…
ठाकूर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते, अर्बन बँकेचे माजी व्हॉईस चेअरमन रणजीत शिंदे यांनी देखील माघार घेत जितेंद्र ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. ” सामाजिक जाणिवेतून मी माघार घेतली असून समाज म्हणून आपण जितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी उभे रहावे” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीवेळी तालुका ठाकूर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप धोंडू ठाकूर, ठाकूर समाज सेवा मंडळाचे महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *